शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने लोटूनही नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातील शुल्क घोटाळ्याची चौकशी अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:19 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर येऊन तीन महिन्यांचा काळ लोटला तरी चौकशी अपूर्णच आहे.

ठळक मुद्देपुणेची समिती आली अन् गेली

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात नोंदणी शुल्काचा घोटाळा समोर येऊन तीन महिन्यांचा काळ लोटला तरी चौकशी अपूर्णच आहे. अद्यापही चौकशी समितीच्या हाती काहीच न लागल्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाने पुणेच्या समितीकडून ‘आॅडिट’ केले. चार सदस्यीय समितीने सहा दिवस चौकशी केली. परंतु या समितीच्या हाती काय लागले हे अद्यापही सामोर आले नसल्याने उलट-सुलट चर्चेला पेव फुटले आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयातील राजकुमार डोमळे नावाचा कर्मचारी बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांकडून नोंदणी शुल्कापोटी ४० ऐवजी ८० रुपये घ्यायचा. शासकीय तिजोरीत मात्र तो ४० रुपयेच जमा करायचा. अनेक पावत्यांमध्ये डोमळेने खोडतोड करून ८० ऐवजी ४० रुपये केल्याचे प्रकरण ८ आॅक्टोबर २०१७ रोजी उघडकीस आले. परंतु सुरुवातीला या प्रकरणाची पोलीस तक्रार झाली नव्हती. मनोरुग्णालय प्रशासनाला ही चूक उमगली आणि २९ नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर ६ डिसेंबर २०१७रोजी मानकापूर पोेलिसांनी घोटाळेबाज लिपिक राजकुमार डोमळेविरोधात गुन्हा दाखल केला. मनोरुग्णांच्या नोंदणी तिकिटांमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्रवीण नवघरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. घोटाळ्याला तीन महिने लोटले. पण, समितीला नेमका कितीचा घोटाळा हे निदर्शनास आले नाही. अधिवेशनादरम्यान मनोरुग्णालयातील घोटाळा चर्चेत येऊ शकतो. म्हणून सहसंचालक (मनोरुग्णालय) डॉ. साधना तायडे यांनी १४ डिसेंबर रोजी पुणे येथील चार सदस्यीय ‘आॅडिट’ समितीला घोटाळ्याचे ‘आॅडिट’ करण्यास मनोरुग्णालयात बोलावले. आतापर्यंत झालेल्या चौकशीची सर्व कागदपत्रे डॉ. नवघरे यांनी पुणेच्या ‘आॅडिट’ समितीकडे सुपूर्द केल्यानंतर समितीने सहा दिवस मनोरुग्णालयात राहून ‘आॅडिट’ केले आणि १९ डिसेंबरला समिती पुण्याला रवाना झाली. परंतु, ‘आॅडिट’मध्ये कितीचा घोटाळा आढळला याविषयी समितीने उपसंचालकांना, अधीक्षकांना काहीही सांगितले नाही. त्यामुळे घोटाळ्याची रक्कम अजूनही गुपितच आहे.८० टक्के चौकशी पूर्णसूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चौकशी समितीकडून ८० टक्के चौकशी पूर्ण झाली आहे. उर्वरित चौकशी पुन्हा होणार आहे. रुग्णालय प्रशासनाने दोन आरोग्य उपसंचालक कार्यालयाला विनंतीपत्र पाठवून चौकशीसाठी चार-पाच कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.कारवाई एकावरचरुग्णालय प्रशासनाने डोमळेला निलंबित केले. त्यानंतर त्याच्याकडून ४९ हजार वसूल करण्यात आले. पोलिसांत डोमळेविरोधात गुन्हाही दाखल झाला. पण, या सर्व प्रक्रियेतील संबंधित कॅशिअर, अकाऊटंट, प्रशासकीय अधिकाऱ्याची चौकशी झाली नाही. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर