शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची तांब्याची तार चोरणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 00:31 IST

रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभातील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देआशुतोष पांडे यांची माहिती : तार खरेदी करणाऱ्या भंगार व्यावसायिकांनाही पकडले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या इतवारी ते खापरखेडा सेक्शनमध्ये रेल्वेची तांब्याची ओएचई तार चोरी करून त्याची भंगार व्यावसायिकांना विक्री करणाऱ्या तिघांना दक्षिण पूर्ण मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली असून ही तार खरेदी करणाऱ्या दोन भंगार व्यावसायिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभातील रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, सहायक सुरक्षा आयुक्त ए. के. स्वामी यांनी गठित केलेल्या टास्क टीम आणि मोतीबाग रेल्वे सुरक्षा दलाने इतवारी-सावनेर रेल्वे सेक्शनमध्ये तांब्याची तार चोरी करणाऱ्यांविरुद्ध संयुक्त अभियान राबविले. रेल्वे सुरक्षा दलाचे मोतीबागचे वरिष्ठ निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात ४ मार्चला इतवारी-खापरखेडा रेल्वे सेक्शनमध्ये पाहणी करण्यात आली. यावेळी काही व्यक्ती रेल्वे लाईनवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळले. घेराव घालून त्यांना पकडण्यात आले. त्यांनी आपले नाव सेवकराम ऊर्फ बडा नानु तेजराम बाहेकर (४०), राधेशाम ऊर्फ गोलु भाऊराव पातोरकर (३०), आणि अक्षय ऊर्फ बॉड योगेश गोंडाणे (२४) रा. चिचोली ता. सावनेर असे सांगितले. त्यांच्या जवळून ओएचई तांब्याची १२ किलोग्रॅम तार किंमत ४५०० जप्त करण्यात आली. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी यापूर्वीही खापरखेडा येथे तांब्याची तार चोरुन भंगार व्यावसायिकांना विकल्याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने चोरीची तांब्याची तार खरेदी करणाऱ्या शेख तामिज शेख जाफर (५५) रा. जयभीमगर, छिंदवाडा रोड नागपूर आणि अब्दुल मतिन अब्दुल हमीद (४०) रा. महेंद्रनगर, टेकानाका नागपूर या दोघांना अटक केली. दोघांकडून ८८ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली. आरोपींची ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई निरीक्षक गणेश गरकल, उपनिरीक्षक मो. मुगिसुद्दीन, प्रकाश रायसेडाम, के. ए. अन्सारी, विनोद उईके, सतीश इंगळे, ईशांत दीक्षित यांनी पार पाडली.

 

टॅग्स :railwayरेल्वेtheftचोरी