शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

प्रायोगिक तत्त्वावर तीन मराठी शाळा सुरू : मनपाची हायकोर्टात माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 9:45 PM

महापालिकेने आवश्यक विद्यार्थी मिळत नसल्याच्या कारणावरून मराठी माध्यमाच्या ८१ पैकी ३४ शाळा बंद केल्या होत्या. त्यापैकी तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देदर महिन्याला मागितला अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महापालिकेने आवश्यक विद्यार्थी मिळत नसल्याच्या कारणावरून मराठी माध्यमाच्या ८१ पैकी ३४ शाळा बंद केल्या होत्या. त्यापैकी तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. महापालिकेने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.गेल्या तारखेला न्यायालयाने महापालिका स्वत:हून पुढाकार घेऊन बंद मराठी शाळा सुरू करणार का अशी विचारणा केली होती. महापालिकेने त्याला प्रतिसाद देत तीन शाळा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने महापालिकेच्या या पुढाकाराची प्रशंसा केली. तसेच, या शाळांसंदर्भात दर महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात अखिल भारतीय दुर्बल समाज विकास संसाधन संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आशुतोष धर्माधिकारी यांनी बाजू मांडली.मराठी शाळांची दुरवस्थाबंद करण्यात आलेल्या मराठी शाळांमध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी विविध ठिकाणी उच्च पदांवर कार्यरत आहेत. परंतु, सध्या या शाळांच्या रिकाम्या इमारतींमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. परिसरातील नागरिक गुरेढोरे बांधण्यासाठी या इमारतींचा उपयोग करतात. त्यामुळे या शाळा सुरू करण्यात याव्यात. शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शाळांना आधुनिक स्वरूप देण्यात यावे. गुणवत्ताप्राप्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात. पालकांना मराठी शाळांनी आकर्षित केल्यास ते आपोआप त्यांच्या पाल्यांना या शाळांमध्ये शिकायला पाठवतील असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाSchoolशाळाmarathiमराठी