शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात आॅईल टॅँकमध्ये पडल्याने तीन मजूर बेशुद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:43 IST

कामठी रोडवरील एनर्जी अ‍ॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोल केमिकल्स भीलगाव लि. कंपनीत घडली.

ठळक मुद्देदोघांची प्रकृती गंभीर : सफाई करतांना घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी रोडवरील एनर्जी अ‍ॅण्ड केमिकल कंपनीच्या अंडरग्राऊंड आॅइल टँकची सफाई करतांना तीन मजूर टंकीमध्ये पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध झाले. टँकमधील केमिकल गॅसमुळे ते मजूर बेशुद्ध झाल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजता कामठी राडवरील गोवर्धन एनर्जी अ‍ॅण्ड पेट्रोल केमिकल्स भीलगाव लि. कंपनीत घडली.राजू डरिया (३५), कृष्णकुमार (३०) आणि चोरकू उर्फ छोटू अशी जखमी मजुरांची नावे आहे. तिघेही मजूर सफाई करीत होते. खूप वेळ होऊनही ते टँकबाहेर न आल्याने कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांनी अग्नीशमन दलाला सूचित केले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तिन्ही मजूरांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले. राजू व कृष्णकुमारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चोरकूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.सूत्रानुसार ही कंपनी नीलेश महाजन, राहुल आगोजी, आणि कपिल चांडक हे पार्टनरशिपमध्ये चालवतात. कंपनी परिसरात जमीनीच्या आत आॅईलची १० हजार लीटरची टँक आहे. यात आॅइल टाकण्यासाठी एक गोलाकार झाकन झाले. ठेकेदार प्रकाश लिल्लारे यांना कंपनी आणि टँकच्या सफाईचे काम देण्यात आले होते. सोमवारी सफाई करण्यासाठी टँकला ९० टक्के खाली करण्यात आले होते. दुपारी १२ वाजता टँकचे झाकन उघडण्यात आले. सर्वप्रथम चोरकू उर्फ छोटू टँकमध्ये उतरला. काही वेळानंतर आवाज देऊनही तो बाहेर आला नाही म्हणून त्याला आवाज देत राजू टँकमध्ये उतरला. त्यालाही आवाज दिल्यावर प्रतिसाद न मिळाल्याने कृष्णकुमारही टँकमध्ये उतरा. टँक काही दिवसांपासून बंद असल्यामुळे टँकमध्ये गॅस तयार झाली. त्यामुळे तिघेही बेशुद्ध झाले असावे, असे सांगितले जाते.पायात दोरीचा फास अडकवून बाहेर काढलेअग्नीशमन अधिकारी एस.बी. रामगुनावार यांच्यानुसार टँकमध्ये तिघेही बेशुद्ध होऊन पडल्याने आत विषारी गॅस असल्याची शक्यता होती. त्यामुळे आत उतरून मजुरांना बाहेर काढणे धोक्याचे होते. अशा वेळी दोरीचा फास तयार केला व तो मजुरांच्या पायात अडकवून त्यांना हळू-हळू बाहेर काढण्यात आले. 

 

टॅग्स :AccidentअपघातPetrol Pumpपेट्रोल पंप