शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अपघातात तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:03 IST

accident death पारडी, कपिलनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीसह तिघांचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देएक गंभीर जखमी - पारडी, कपिलनगर आणि हुडकेश्वरमध्ये गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - पारडी, कपिलनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या वेगवेगळ्या अपघातात एका अनोळखी व्यक्तीसह तिघांचा करुण अंत झाला. वीरेंद्र विजय मारकंडे (वय २६, रा. नवीननगर), सज्जनसिंग संधू (वय ६४, रा. तक्षशिलानगर) आणि एक अंदाजे ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतांमध्ये समावेश आहे. जखमीचे नाव राहुल बिसेन आहे.

ट्रेलरमुळे झाला घात

नवीननगर दिनेश किराणा दुकानाजवळ राहणारा वीरेंद्र विजय मारकंडे त्याचा मित्र राहुल लहूजी बिसेन सोबत गुरुवारी दुपारी २.३० च्या सुमारास दुचाकीने जात होता. कापसी पुलाजवळ त्याची भरधाव दुचाकी ट्रेलरवर धडकली. त्यामुळे वीरेंद्रचा जागीच मृत्यू झाला तर राहुल गंभीर जखमी झाला. राहुलच्या कुटुंबात आईवडील, भाऊ बहिण, पत्नी आणि ८ महिन्याचा मुलगा आहे. ट्रकवर क्लिनर म्हणून काम करणारा वीरेंद्र कुटुंबप्रमुख होता. वीरेंद्रच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर जबर मानसिक आघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच पारडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वृद्ध मजुराचा गेला बळी

तक्षशिलानगरातील रहिवासी सज्जनसिंग मंगलसिंग संधू हे मिळेल ते काम करून कुटुंब चालवत होते. १७ जुलैला दुपारी ते कपिलनगरातून कामाचे पैसे आणण्यासाठी जात होते. वेगात आलेल्या ट्रकचालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना डॉक्टरांनी २१ जुलैला संधू यांना मृत घोषित केले. सिंधरकाैर सज्जनसिंग संधू यांच्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी ट्रकचालक देवेंद्र रतिराम यादव (वय ३०, रा. दाैलतग्राम, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सायकलस्वाराचा बळी गेला

हुडकेश्वरमध्ये एका सायकलस्वाराचा ट्रकचालकाने बळी घेतला. मृताचे नाव स्पष्ट झाले नाही. गुरुवारी दुपारी ११.४५ वाजताच्या दरम्यान सायकलस्वार हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असताना निष्काळजीपणे ट्रक चालवून आरोपी ट्रकचालकाने सायकलस्वाराचा बळी घेतला. त्यानंतर आरोपी ट्रकचालक पळून गेला. माहिती मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहचले. मृताची ओळख पटविण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू