शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:02 IST

भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देपाचगाव टर्निंगवर टिप्परची कारला धडक मृत तिघेही नागपुरातील

आॅनलाईन लोकमतनागपूर : भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव टर्निंगजवळ सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.मृतांमध्ये सुशील वसंत जावळे (३०), त्याचे वडील वसंत जावळे (६१), आई पुष्पा जावळे (५८) तिघेही रा. शक्तीनगर, खरबी रोड, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. जावळे कुटुंबीय एमएच-४९/एई-२५३६ क्रमांकाच्या कारने पवनी (जि. भंडारा) येथे गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या कारला एमएच-४०/बीजी-८०७ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. त्यात सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या आई-वडिलांना मेडिकलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर कार चक्काचूर झाली होती. याप्रकरणी कुही पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. टिप्पर चालक कन्हैयालाल पटेल (२८, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुशील हा बुटीबोरी एमआयडीसीतील कंपनीत कार्यरत होता. पवनी येथे तो त्याची पत्नी पद्मिनी आणि चार महिन्याचा मुलगा कौस्तुभला आणण्यासाठी गेला होता. परंतु त्याचे सासरे बंडू भोयर आणि इतरांनी काही दिवस राहू देण्याची विनंती केली. त्यानंतर तो आई-वडिलांसह नागपूरसाठी निघाला. दरम्यान त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा