शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अस्थी विसर्जनाला गेलेले तिघे बुडाले : खापरखेडा परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 21:04 IST

आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले.

ठळक मुद्देकिल्ले कोलारच्या डोहात दोघांचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर(खापरखेडा) : आजीच्या अस्थीे विसर्जन झाल्यानंतर एक जण अंघोळीसाठी डोहात उरतला. तो बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे दोन मित्र मदतीला धावले. मात्र, पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. तिघांपैकी दोघांचे मृतदेह शोधून काढण्यात बचाव पथकाला यश आले असून, एकाचा थांगपत्ता लागला नाही. तिघेही नागपूर शहरातील रहिवासी आहेत. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किल्ले कोलार येथील कोलार नदीच्या डोहात शनिवारी (दि. १९) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

आकाश राजेंद्र राऊत (२०) व शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर (२०) दोघेही रा. रा. रामेश्वरी, नागपूर अशी मृतांची नावे असून, हर्षित राजू येदवान (२०, रा. रामेश्वरी, नागपूर) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघेही मित्र होत. लहानूबाई सदाशिव सरवरे, रा. रामेश्वरी, नागपूर यांचे निधन झाल्याने त्यांचे कुटुंबीय शनिवारी दुपारी रक्षा विसर्जनासाठी किल्ले कोलार येथे आले होते. यात मनिषा भास्कर जाधव, बंडू सदाशिव सरवरे, शोभा बंडू सरवरे, सुमित बंडू सरवरे, शिवानी बंडू सरवरे, राकेश यादव, कपिल पाल, शुभम रामटेके, प्रणय बोरकर, शंतनू ऊर्फ नयन कैलास येडकर, हर्षित राजू येदवान व आकाश राजेंद्र राऊत या १२ जणांचा समावेश होता.अस्थी व रक्षा विसर्जन झाल्यानंतर शंतनू कोलार नदीच्या डोहात अंघोळ करण्यासाठी उतरला. गढूळ व शेवाळयुक्त पाणी नाकात गेल्याने त्याला गुदमरल्यागत झाले. तो कसातरी करत असल्याचे लक्षात येताच हर्षित व आकाश त्याच्या मदतीला गेले. त्यांनी शंतनूला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात शंतनूसोबत दोघेही बुडाले. त्यामुळे इतरांनी या प्रकाराची माहिती लगेच पोलिसांना दिली. फायर अ‍ॅण्ड रेस्क्यू, एसडीआरएफ व आरपीसीच्या बचाव पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.या बचाव पथकांना अंधार होईपर्यंत आकाश व शंतनूचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. हर्षित मात्र गवसला नाही. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. ते रविवारी (दि. २०) सकाळी पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर