शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारचा टायर फुटून भीषण अपघात; पती, पत्नी व मुलगा जागीच ठार, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 16:01 IST

अकोलाकडून जबलपूरकडे भरधाव वेगात जाणारी कार टायर फुटल्याने कोंढाळीपासून काही अंतरावर निर्मल सुतगिरणीजवळ उललटी. यात पती, पत्नी व तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला असून चालक महिला गंभीर जखमी झाली आहे.

नागपूर : भरधाव वेगात जाणाऱ्या कारचा अचानक टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात पती, पत्नी व तरुण मुलाचा जागीच मृत्यू झाला तर कारचालक महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमरावती कोंढाळी मार्गावर निर्मल सुतगिरणीजवळ आज (दि. १२) दुपारी १ च्या सुमारास घडली.

अनुपम विनोदकुमार गुप्ता (वय ५०) त्यांची पत्नी रेनु अनुपम गुप्ता (वय ४५),  मुलगा अक्षद अनुपम गुप्ता (वय २७) सर्व रा. जबलपूर मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे असून कारचालक व अनुपम गुप्ताची बहिण अर्चना संदिप अग्रवाल (वय ५७) असे जखमी महिलेचे नाव आहे. 

सदर कार (एमपी २० सीएच  ३०४१) ही अकोला येथुन नागपूर मार्गे जबलपूरकडे जात होती. दरम्यान, कोंढाळी अमरावती मार्गावर कोंढाळीपासून २ किमी अंतरावर निर्मल सुतगिरणीजवळ कारच्या समोरील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने कारचालक अर्चना अग्रवाल यांचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रोड दुभाजकावरून उसळून तीन पलटी खात पुन्हा उभी झाली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पार चुराडा झाला. तर, तिघांही मृतकांचे डोके चेंदामेंदा होवून मेंदू बाहेर आले होते. 

माहिती मिळताच पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना अग्रवाल यांना उपचारार्थ नागपूर येथील खासगी रुग्णालयात हलविले. दरम्यान, कोंढाळी अमरावती मार्गावर वाहतूक ठप्प  झाली होती. कोंढाळी पोलिसांनी तिघांचे मृतदेह कारबाहेर काढून शवविच्छेदन करीता काटोल ग्रामीण  रुग्णालयात रवाना केले.

 घटनास्थळी काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव व राष्ट्रीय महामार्ग पोलीस दलांचे उप अधिक्षक संजय पांडे व शरद मेश्राम यांनी भेट दिली. घटनेचा पुढील तपास कोंढाळी पोलीस तपास करीत आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकार