शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

CoronaVirus in Nagpur : नागपुरात लागोपाठ तीन मृत्यू, नऊ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 23:05 IST

सलग तीन दिवस तीन मृत्यूंनी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आठ दिवसांत हा चौथा मृत्यू आहे. मृतांची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवल्याने एका डॉक्टरसह नऊ परिचारिका व दोन अटेन्डंटवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली.

ठळक मुद्देरुग्णसंख्या ३७३ : सातव्या मृत्यूची नोंद : ४५ रुग्ण कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सलग तीन दिवस तीन मृत्यूंनी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. आठ दिवसांत हा चौथा मृत्यू आहे. मृतांची संख्या सात झाली आहे. विशेष म्हणजे, मृत महिलेच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवल्याने एका डॉक्टरसह नऊ परिचारिका व दोन अटेन्डंटवर क्वारंटाईन होण्याची वेळ आली. आज नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ३७३वर पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे, आज मेडिकलमधून ४२ तर मेयोमधून तीन असे एकूण ४५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. बरे झालेल्यांची संख्या २७२ झाली आहे.मेयोच्या अपघात विभागात सोमवारी सायंकाळी ५६ वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या नातेवाईकांनी पत्ता हंसापुरी सांगितल्याने डॉक्टरांनी रुग्णावर संशय न घेता मेडिसीनच्या अतिदक्षता विभागात दाखल केले. महिला रुग्णाला हृदयविकाराचा त्रास होता. रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता तातडीने अतिदक्षता विभागात भरती केले. येथे उपचार सुरू असताना साधारण २० मिनिटात रुग्णाचा मृत्यू झाला. मृताच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले असता सोमवारी सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरसह, परिचारिका व अटेन्डंट अशा नऊ जणांना क्वारंटाईन करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाकडून मृताची अधिक माहिती घेतली असता मृत महिला कंटेन्मेंट परिसर म्हणजे मोमिनपुरा येथील रहिवासी होती. मृताच्या नातेवाईकांनी हे आधीच सांगितले असते तर आज डॉक्टर, नर्सेस व अटेन्डंटला क्वारंटाईन करण्याची गरज पडली नसल्याचे सांगितले जाते.गड्डीगोदाम येथील पुन्हा सहा रुग्ण पॉझिटिव्हमोमिनपुरा व सतरंजीपुरा येथील सर्वाधिक रुग्ण दिसून येत असताना आता यात गड्डीगोदाम येथील रुग्णांची भर पडत चालली आहे. रविवारी या वसाहतीतून पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना सोमवारी पुन्हा सहा रुग्ण मेयोच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. या वसाहतीतील आतापर्यंत १२ रुग्णांचे निदान झाले आहे. तर मोमिनपुऱ्यातील दोन रुग्ण माफसुच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले. हे आठही रुग्ण सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन होते.मेयोतून ३ तर मेडिकलमधून ४२ रुग्ण घरीमेयोमधून मोमिनपुरा येथील दोन पुरुष व एका महिलेला सुटी देण्यात आली. तर मेडिकलमधून तब्बल ४२ रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाबाधित सुधारीत डिस्चार्ज धोरणानुसार मेडिकलने या रुग्णांना सुटी दिल्याचे सांगण्यात येते. या रुग्णांना पुढील सात दिवस सक्तीचे होम आयसोलेशन राहायचे आहे. यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आल्याची माहिती आहे.सारीचा एक मृत्यू तर आठ नवे रुग्ण भरती‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ म्हणजे ‘सारी’च्या रुग्णांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. आतापर्यंत सारी व कोविड पॉझिटिव्ह आलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे या रुग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. आज अमरावती येथून आलेल्या ७०वर्षीय महिलेचा मेडिकलमध्ये मृत्यू झाला. या शिवाय, मेडिकलमध्ये सारीचे आठ नवे रुग्ण भरती झाले. यात तीन लहान मुलांसह चार पुरूष व एक महिला आहे. सध्या १४ रुग्ण उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २४७दैनिक तपासणी नमुने २५९दैनिक निगेटिव्ह नमुने २५०नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ३७३नागपुरातील मृत्यू ७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण २७२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २०८६क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १,८१४पीडित-३७३-दुरुस्त-२७२-मृत्यू-७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू