एक लाखाचे दागिने लंपास : अंबाझरी, अजनी आणि धंतोलीत गुन्हेनागपूर : ११ तासांच्या कालावधीत लुटारूंनी तीन ठिकाणी चेनस्रॅचिंगचे गुन्हे केले. अंबाझरी, अजनी आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यात लुटारूंनी १ लाखाचे दागिने लंपास केले. आज सकाळी ८ च्या सुमारास रुपा सोरेंद्रनाथ चॅटर्जी त्यांचे काका एस. एन. चॅटर्जी यांच्यासोबत अॅक्टीव्हाने बजाजनगर चौकाकडे जात होते. व्हीएनआयटी गेटसमोर मोटरसायकलवरील लुटारूने रुपा यांच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. संदीप सोरेंद्रनाथ चॅटर्जी यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारे शुक्रवारी रात्री ९.३५ ला धंतोलीत बेला घनश्याम अलवाणी (वय ४५, रा. जरीपटका) या महिलेच्या गळ्यातील ३० हजारांची सोनसाखळी पल्सरवरील दोन लुटारूंनी हिसकावून नेली. तत्पूर्वी, रात्री ८. ४० वाजता अजनीतील पोलीस वसाहतीसमोर करिज्मा दुचाकीवर आलेल्या दोन लुटारूंनी शितल मधुसूदन बन्सोड (वय ५७) यांच्या गळ्यातील ४० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. (प्रतिनिधी)
११ तासात तीन चेनस्रॅचिंग
By admin | Updated: June 22, 2014 01:03 IST