शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपुरात पारडी पुलाच्या मार्गातील तीन इमारती पाडल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:47 IST

भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे११ दुकाने हटविली : मनपा व नासुप्रच्या पथकांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील प्रस्तावित पारडी उड्डाणपुलाच्या रुंदीकरणात अडथळा ठरलेल्या तीन इमारती मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात महापालिका व नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पाडल्या. सकाळी ११ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.यात गणेश मानकर यांच्या दोन मजली इमारतीसह १८ मीटरच्या जोड रस्त्यालगतच्या रहिवासी सुशीलाबाई गरोडिया, जयकिशोर जयस्वाल यांच्या इमारती पाडण्यात आल्या. तसेच दिलीप लालवानी, रश्मी चवरे, चंदाबाई देवरे, जीजाबाई मानवटकर, राकेश वाहणे, नरेंद्र उपरे, सुनील रंगारी, निरंजन शेंडे आदींची घरे तोडण्यात आली. लकडगंज झोनने यासंदर्भात घरमालकांना आधीच नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी मनपा, नासुप्र व एनएचआयच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.दुसऱ्या एका पथकाने नेहरूनगर झोनमधील भांडेप्लॉट ते दिघोरी चौक या दरम्यानच्या मार्गावरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. महाल झोनच्या पथकाने आजमशहा चौक व सीए रोडवरील फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. कारवाईदरम्यान दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई मनपाचे सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन अधीक्षक यादव जांभुळकर, नासुप्रचे अभियंता संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी भरत मुंडले, पथक प्रमुख मनोहर पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे आदींनी केली.प्रचंड पोलीस बंदोबस्तपारडी मार्गावरील पक्की घरे पाडताना स्थानिक नागरिकांचा विरोध होणार असल्याची शक्यता विचारात घेता, प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ५० पोलिसांचा ताफा ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर