शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात गुंड पिंटू ठवकर हत्याकांड :तिघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 01:17 IST

पाचपावलीतील कुख्यात गुंड भुऱ्या उर्फ पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याला त्याचा गेम होणार आहे, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी गुजरातला पळून गेला होता. मात्र, तेथे त्याला मनासारखे काही करता येत नव्हते त्यामुळे नागपुरात परतला अन् अखेर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी शुक्रवारी दुपारी त्याची निर्घृण हत्या केली. दरम्यान, त्याच्या हत्येतील अटक केलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.

ठळक मुद्देफरार आरोपींचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावलीतील कुख्यात गुंड भुऱ्या उर्फ पिंटू दिनू ठवकर (वय ३५) याला त्याचा गेम होणार आहे, याची कल्पना आली होती. त्यामुळे तो दोन महिन्यांपूर्वी गुजरातला पळून गेला होता. मात्र, तेथे त्याला मनासारखे काही करता येत नव्हते त्यामुळे नागपुरात परतला अन् अखेर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी शुक्रवारी दुपारी त्याची निर्घृण हत्या केली. दरम्यान, त्याच्या हत्येतील अटक केलेल्या तीन आरोपींना पोलिसांनी आज न्यायालयात हजर करून त्याचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.पाचपावलीत जुगार अड्डा चालविणारा तसेच अवैध दारू विकणारा कुख्यात पिंटूने लेंडी तलाव परिसरातील अनेकांचे जगणे मुश्किल केले होते. त्याचे कुणाशी जास्त वेळ पटत नव्हते. पिंटूच्या हत्येचा सूत्रधार सीताराम शाहू हा आधी पिंटूसोबतच राहायचा. तो त्याच्या गुन्हेगारीत आणि अवैध धंद्यात सहभागी होता. मात्र, पिंटूने त्याच्याशीही वैर घेतले होते. तो शाहू आणि त्याच्या साथीदारांना नेहमी मारहाण करून धमकी द्यायचा. त्यामुळे शाहू आणि साथीदारांनीही पिंटूची फिल्डींग लावली होती. ते लक्षात आल्यामुळे तो गुजरातमध्ये पळून गेला होता. मात्र, तेथे त्याच्या गुन्हेगारीला वाव नव्हता. कष्ट करून तो जगू शकत नव्हता. त्यामुळे तो नागपुरात पळून आला आणि त्याने येथे पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. तो प्रतिस्पर्धी गुंडांसोबतही नेहमीच कुरबूर करायचा. त्यामुळे अनेक जण पिंटूवर टपून होते.या पार्श्वभूमीवर, पिंटू शुक्रवारी दुपारी २. ३० च्या सुमारास कोर्टातून तारीख घेऊन गौरव ढवळे नामक साथीदारासह दुचाकीवर बसून अड्ड्याकडे जात होता. बारईपुरा, राऊत चौक शाळेजवळ येताच सीताराम मुलचंद शाहू (वय ३०, रा. नाईक तलाव), सागर ऊर्फ भांजा मंगल तेलंगे (वय १८, रा. मस्कासाथ), मंगल अरुण मांढरे (वय २०, रा. ढिवर मोहल्ला) आणि त्यांच्या साथीदारांनी पिंटूला घेरले. त्याच्यावर चाकू, तलवार, गुप्ती आणि कुकरीसारख्या घातक शस्त्रांचे २५ पेक्षा जास्त घाव घालत पिंटूच्या शरिराची चाळणी केली. त्याला ठार मारल्यानंतर आरोपी पळून गेले. पाचपावली पोलिसांनी धावपळ करून शाहू, तेलंगे आणि मांढरेसह अन्य एका अल्पवयीन आरोपीला अटक केली.त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करून त्यांचा ६ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. या गुन्ह्यात आणखी तीन ते चार आरोपी आहेत. पोलिसांना त्यांची नावेही कळली असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.तो विकायचा नझूलची जागालेंडी तलावाच्या बाजूचा भाग खोलगट असल्यामुळे ती जागा पडित आहे. या खोलगट भागात झोपडपट्टी वसली आहे तर, काही जागा रिकामी आहे. ही जागा नझूलची आहे. त्या जागेवर माती-मुरूम टाकून पिंटू ती जागा समांतर करायचा आणि ती नझूलची जागा झोपडे टाकणारांना विकायचा. त्याच्या परवानगीशिवाय तेथे कुणी झोपडे टाकल्यास त्याच्याकडे धमकावून पिंटू १० हजारांपासून ५० हजारांपर्यंतची मागणी करायचा. पैसे दिले नाही तर झोपडे उपटून फेकायची धमकी द्यायचा.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून