शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या मेडिकलमधून तीन आरोपी फरार : पोलीस दलात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:41 IST

वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आलेल्या तीन आरोपींनी हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले.

ठळक मुद्देराजस्थानमधील टोळीचे अट्टल चोरटे : हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी

आॅनलाईन लोकमतनागपूर : वैद्यकीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये आलेल्या तीन आरोपींनी हुडकेश्वर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. विविध राज्यांत मोठमोठ्या घरफोडी करणारे हे तीन आरोपी राजस्थानमधील रहिवासी असून ओमप्रकाश ऊर्फ ओम बिष्णोई, कैलासराम बिष्णोई, (रा. मिर्झापूर उत्तर प्रदेश) आणि ओमप्रकाश पांडे (बाडमेर, राजस्थान) अशी पोलिसांच्या तावडीतून फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत.ते कुख्यात घरफोडी करणारे आहेत. ओमप्रकाश आणि कैलास हे दोघे नातेवाईक आहेत. ते नंदनवन झोपडपट्टीत गल्ली नंबर १२ मध्ये सोनेकरच्या घरी भाड्याने राहत होते, तर पांडे ओंकारनगरातील पटेल नामक व्यक्तीच्या घरी भाड्याने राहत होता. दिवसा कुलूपबंद घर शोधायचे आणि रात्री घरफोडी करायची, अशी त्यांची कार्यपद्धत आहे. त्यांना हुडकेश्वर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. कोर्टाने त्यांना २० डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर केला होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना बुधवारी रात्री मेडिकलमध्ये नेण्यात आले. त्यांच्याभोवती चार पोलीस होते. त्या चौघांच्याही हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाले. ते लक्षात आल्यानंतर बंदोबस्ताची जबाबदारी असलेल्या हुडकेश्वरच्या पोलिसांनी नियंत्रण कक्षात माहिती देऊन फरार आरोपींना अटक करण्यासाठी धावपळ सुरू केली. रात्री ८ वाजता ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.वेगवेगळ्या कारणामुळे सतत चर्चेत राहणारे हुडकेश्वर पोलीस ठाणे या घटनेमुळे हादरले. ठाणेदार झावरे यांच्यासह मोठा पोलीस ताफा, परिमंडळ ४ चे उपायुक्त एस. चैतन्य यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी मेडिकलकडे धावले. त्यांनी मेडिकल परिसर आणि आजूबाजूच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणे सुरू केले.हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह अवघे सरकारच नागपुरात मुक्कामाला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या संबंधाने शहरभर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे. मेडिकलमध्येही मोठा पोलीस ताफा राहतो. अशास्थितीत तीन अट्टल गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देऊन पळाल्याने सारेच अचंबित झाले आहे. आरोपींचे आणखी साथीदार फरार आहेत. त्यामुळे त्यांनी या तिघांना फरार होण्यासाठी मदत केली असावी, असाही संशय व्यक्त केला जात आहे.दोषींचे होणार निलंबनहुडकेश्वर पोलीस ठाण्याचा वादग्रस्त कारभार या प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. आरोपींसोबत चार-चार पोलीस असताना ते पळूनच कसे जाऊ शकतात. ज्यांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेले ते चारच्या चार पोलीस काय करीत होते, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. दरम्यान, त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. त्या पोलिसांना २४ तासात निलंबित केले जाऊ शकते, असे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.

 

 

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे