शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, धमकीचा इ-मेल जर्मनीहून!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: April 30, 2024 23:51 IST

या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याच्या धमकीचा इ-मेल सोमवारी विमानतळ संचालकाला आला. हा इ-मेल जर्मनीहून आल्याची माहिती तपासणीदरम्यान पुढे आली आहे. या घटनेची चौकशी वरिष्ठ स्तरावर सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.धमकीचा मेल सोमवारी सकाळी ९.४५ वाजता विमानतळ संचालकाला आल्यानंतर विमानतळ व्यवस्थापन चिंतेत आणि प्रशासन अलर्ट मोडवर आले. त्यानंतर विमानतळ प्रशासनाने सुरक्षेच्या सर्व उपाययोजना केल्या. सीआयएसएफ आणि स्थानिक पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम सुरू केली. बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकाचा शोध मोहिमेत समावेश होता. तपासणीदरम्यान सुरक्षा यंत्रणांना कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. सोमवारी अशाच धमकीचे मेल नागपूरसह जयपूर, आगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळ व्यवस्थापनालाही आले. या मेलमध्ये विमानतळांवर बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. सोमवारी विमानतळावर सोनेगाव पोलिसांची १५-१५ ची दोन पथके तैनात होती. मात्र मंगळवारी ५-५ चे पथक तैनात असून परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. संशयितांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा यंत्रणांचीही विमानतळावर नजर ठेवून आहेत.

टॅग्स :Airportविमानतळnagpurनागपूर