शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शंभरकरने घेतली एक हजाराची लाच

By admin | Updated: June 20, 2014 01:04 IST

शेतीच्या लाभक्षेत्राचा अहवाल देण्यासाठी अशोक शंभरकर नामक कालवा निरीक्षकाने एक हजारांची लाच मागितली. लाच स्वीकारताच शंभरकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली.

एसीबीची कारवाई : पाटबंधारे विभागात खळबळ नागपूर : शेतीच्या लाभक्षेत्राचा अहवाल देण्यासाठी अशोक शंभरकर नामक कालवा निरीक्षकाने एक हजारांची लाच मागितली. लाच स्वीकारताच शंभरकरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली. शंभरकर पाटबंधारे विभाग, वैनगंगा नगर, कार्यालय अजनी येथे कार्यरत आहे. या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ निर्माण झाली. पिपळा डाकबंगला (ता. सावनेर) येथील नितीन काशिनाथ नरड (वय २८) यांच्या वडिलांची १३ एकर शेती आहे. त्या शेतीची दोन भावात वाटणी करायची होती. त्यातील ८ एकरांपेक्षा जास्त जमीन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात अंतर्भूत असलेल्या जमिनीची खरेदी विक्री, वाटणीपत्र, बक्षिसपत्र किंवा गहाणपत्र करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) यांची परवानगी आवश्यक असते. त्याकरिता उपजिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग, वैनगंगानगर अजनी यांना पत्र पाठविण्यात आले. सदर शेती लाभक्षेत्रात येते की नाही, त्याचा अहवाल कळविण्याचे पत्रात नमूद होते. त्या अहवालाला विलंब होत असल्यामुळे तक्रारकर्ते नितीन नरड हे ९ जूनला पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गेले. तेथे कालवा निरीक्षक अशोक शंभरकर यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा अहवाल पाठविण्यासाठी एक हजाराची लाच मागितली. नरड यांनी एसीबीकडे त्याची तक्रार केली. १८ जूनला या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच मागणीची शहानिशा केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत शिरभाते, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे आज दुपारी १२ च्या सुमारास नरड लाचेची रक्कम घेऊन शंभरकर यांच्याकडे गेले. शंभरकरने लाच स्वीकारताच एसीबीचे निरीक्षक अशोक साखरकर, हरीश रेड्डीवार, हवालदार विलास खणके, संतोष पुंडकर, सुभाष तानोडकर, चंद्रशेखर ढोक, दिनेश अदापुरे आदींनी शंभरकरच्या मुसक्या बांधल्या. (प्रतिनिधी)