शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वेडिंग इंडस्ट्रीचे हजारो कोटी कोरोनात स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 22:23 IST

Corona, wedding industry वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत हा उद्योग पार बुडाला आणि या उद्योगावर निर्भर लहानमोठे व्यापारही धुळीस मिळाले आहेत.

ठळक मुद्दे टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाचा केला जातोय निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या शहरीकरणाच्या धामधुमीत विवाह, मुंज, वाढदिवसापासून ते चौदावीच्या कार्यक्रमांसाठी सर्वसुविधांनी युक्ती सेलिब्रेशन हॉल्स, लॉन्सची रचना झाली आणि म्हणता म्हणता हा एक मोठा उद्योग झाला आहे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या वावटळीत हा उद्योग पार बुडाला आणि या उद्योगावर निर्भर लहानमोठे व्यापारही धुळीस मिळाले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या पुन्हा एकदा वाढत्या प्रकोपात आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या धास्तीने भेडसावलेले हे उद्योजक थेट शासनाच्या विरोधात उभे झाले आहेत.

भटकंती करत असताना शहरात जेवढे सेलिब्रेशन्स हॉल, लॉन्स आढळतील त्या सर्वांच्या द्वारावर शासनाच्या निषेधाचे फलक लागलेले आढळतील. वेडिंग इंडस्ट्री बचाव, असा या फलकांचा सूर आहे. शहरात साधारणत: २५०-३०० हॉल्स-लॉन्स आहेत. या प्रत्येक हॉल्स-लॉन्समध्ये कोणतेही सोहळे आयोजित करण्यासाठी सर्व सुविधांच्या मोबदल्यात लाखो रुपये घेतले जातात. एकाच छताखाली सर्व सुविधा प्राप्त होत असल्याने आयोजकांकडून हे पैसे सहजतेने दिले जातात. या हॉल्स-लॉन्समध्ये आयोजित होणाऱ्या सोहळ्यांवर टेण्ट, डेकोरेशन, बॅण्ड, संगीत, गायक आदी कलाकार, भांडी विक्रेते, गिफ्ट विक्रेते, फुलविक्रेते यांचा व्यवसाय चालत असतो. सोबतीला शेकडो रोजगार. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा सगळा उद्योग-व्यापार मोडकळीस आला आहे. टाळेबंदी आणि सोहळ्यांमध्ये येणाऱ्या आमंत्रितांच्या संख्येची मर्यादा, यामुळे अनेक आयोजक आपले सोहळे रद्द करत आहेत आणि पैसा परत मागत आहेत. अशा तऱ्हेने गेल्या वर्षभरात हजारो कोटींचा हा उद्योग रसातळाला गेला आहे. हॉल्स-लॉन्सवाल्यांना कर्मचाऱ्यांना पगार देणे होत नाहीये. वीज-पाणी बिल वाढतच आहे. अशा स्थितीत सगळेच हतबल झाल्याची स्थिती आहे.

आतापर्यंत ५० लाख रुपये केले परत

टाळेबंदीत अनेकांनी सोहळे रद्द केले. काहींनी तशाच छोटेखानी सोहळे पार पाडले. मात्र, सगळ्यांनाच कमी-जास्त प्रमाणात तर काहींना पूर्णच पैसे परत करावे लागले आहे. शिवाय, नियोजित बुकिंग आल्या नाहीत. गेल्या वर्षभरात साधारणत: ५० लाख रुपयांची बुकिंग परत करावी लागली आहे. कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यावा, व्यवस्थेचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न आहे. त्यातच पुन्हा टाळेबंदीची धास्ती आहेच. स्थिती फार भयंकर झाली आहे.

रवींद्र सुरकर, व्यवस्थापक, जैन कलार समाजभवन, रेशीमबाग

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या