शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवरून हजारो बौद्ध बांधवांना हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 01:04 IST

सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

ठळक मुद्देपोलीस व स्मारक समितीवर संताप : नागरिकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी १४ ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षा दिनानिमित्त दीक्षाभूमीवर आलेल्या हजारो बौद्ध बांधवांना रात्रीच्या वेळी हाकलून लावल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. समता सैनिक दलाने पत्रपरिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवत पोलीस व स्मारक समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या दिवसाची आठवण म्हणून नागपूरकर व परिसरातील हजारो बौद्ध बांधव या दिवशी दीक्षभूमीवर कुटुंबासह येतात. परंतु मागील काही वर्षांपासून रात्रीच्या वेळी त्यांना हाकलून लावण्याचे प्रकार वाढले आहे. सोमवारी सुद्धा असाच प्रकार घडला. रात्री मोठ्या संख्येने नागरिक दीक्षाभूमीवर जमले होते. परंतु १० वाजेपासून त्यांना बाहेर काढण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला परिसरातील दिवे बंद करण्यात आले. अनेक लोक कुटुंबासह जेवण करीत होते. त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. यावरून काही लोकानी पोलिसांशी वाद घातला. तेव्हा आम्हाला समितीकडून तशा सूचना असल्याचे सांगण्यात आले. हा अतिशय निंदनीय प्रकार आहे.दीक्षभूमीचे गेट हे रात्री ८ वाजता बंद होते. परंतु १४ तारीख ही विशेष आहे. या दिवशी हजारो लोक राहतात. काही दूरवरूनही येतात. अशा वेळी त्यांना वेळ झाला म्हणून रात्रीच्या वेळी बाहेर काढणे योग्य नाही. या दिवशी दीक्षाभूमीत लोकांना रात्री उशिरापर्यंत राहू देण्यात यावे, अशी मागणी लोकांची आहे परंतु त्याकडे स्मारक समिती लक्ष देत नाही, याचा आम्ही निषेध हा प्रकार तातडीने थांबवण्यात यावा, अशी मागणी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक सुनील सारीपुत्त व प्रवक्ते प्रकाश दार्शनिक यांनी केली. यावेळी कांचन वासनिक, दिपांकर सहारे, सुदर्शन गेडाम, गोपाल बागडे, डॉ. अनिल दवडे, अश्विनी खोब्रागडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीPoliceपोलिस