शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

धर्म वाचविण्यासाठी बलिदान देणारे आदर्शच : सरसंघचालक मोहन भागवत

By योगेश पांडे | Updated: August 6, 2025 18:55 IST

Nagpur : धर्मजागरण न्यासाच्या कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांच्या जीवनात कठीण प्रसंग येतात व त्यांचे धैर्य तुटते. त्यातून ते सन्मार्ग सोडतात. पण, पुरुषार्थी लोक न थकता व न थांबता पूर्ण शक्ती लावून धर्माप्रति पक्के राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात संकटे आली, पण त्यांनी शक्ती व युक्तीने मार्ग काढलाच. मनुष्याच्या मनात धर्माची निष्ठा पक्की हवी. धर्मासाठी अनेकांनी बलिदान दिले आहेत. त्यांच्यावर अत्याचार झाले, पण त्यांनी धर्म नाही सोडला. असेच लोक आपल्यासमोरील आदर्श असले पाहिजेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील भगवाननगरात धर्मजागरण न्यासाच्या नवनिर्मित कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.

धनश्री सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, सहसंघचालक श्रीधर गाडगे, महानगर संघचालक राजेश लोया, धर्मजागरण न्यासचे अखिल भारतीय पदाधिकारी शरद ढोले, न्यासचे अध्यक्ष विजय कैथे प्रामुख्याने उपस्थित होते.

जगातील लोक म्हणतात की, आपण वेगवेगळे आहोत व म्हणून एक व्हावे लागेल. मात्र, आपला धर्म विविधतांचा स्वीकार करण्याची शिकवण देतो. हिंदूधर्म मानवधर्माचे आचरणच शिकवतो. सर्वांचा मार्ग वेगवेगळा असला तरी गंतव्य एकाच जागी असते. त्यामुळे इतरांचा रस्ता बदलण्याचा प्रयत्न करायला नको. तुमचा मार्ग कुठला आहे, यावर संघर्ष व्हायला नको. धर्मजागरण होईल तेव्हाच हिंदू धर्माच्या आचरणाचा समूह अस्तित्वात राहील. धर्म ग्रंथापुरता मर्यादित राहणार नाही. जगाला दिशा दाखविण्यासाठी जगासमोर तसे मॉडेल तयार करणे ही भारताचीच जबाबदारी आहे, असे सरसंघचालक म्हणाले. सुनील भूगावकर यांनी सूत्रसंचालन केले.

धर्म ठीक असला तर समाजात संतुलन-शांती शक्य

धर्म म्हणजे कर्तव्य हा आपला विचार आहे. त्यातूनच राजधर्म, प्रजाधर्म, पितृधर्म या गोष्टी समोर आल्या. सनातन धर्म हा आत्मीयता व विविधतेचा पूर्ण स्वीकार करणे शिकवतो. भारतात विविधता असली तरी शेवटी सर्व लोक एकच आहेत. सर्व विविधतांचा स्वीकार करणे हाच खरा धर्म आहे. लोकांचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्याचे गंतव्य एकच असते. धर्माचे कार्य हे केवळ ईश्वरासाठी नसते तर ते समाजासाठीदेखील असते. त्यामुळेच धर्म ठीक असला तर समाजात संतुलन व शांती नांदू शकते असे सरसंघचालक म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ