शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुण्याहून आलेल्यांनी वाढविली नागपूर जिल्ह्याची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:46 IST

शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देवाढतेय संक्रमितांची संख्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातही कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांनी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव केला आहे. तब्बल दोन महिने कोरोनामुक्त असलेल्या नागपूर जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.चौथ्या लॉकडाऊननंतर शासनाने दिलेली शिथिलता व यानंतर इतर जिल्ह्यात राज्यात अडकलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातील प्रवेश यामुळे ग्रामीण भागामध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. नागपूर जिल्ह्याच्या बाहेर अडकन पडलेले नागपूर जिल्ह्यातील गावात पोहोचत आहेत. तसे प्रशासनाने या नागरिकांना गावातील शाळेत, समाजभवनात क्वारंटाईन केले आहे. परंतु क्वारंटाईनच्या भीतीमुळे काही महाभाग प्रशासनाला न सांगताच पळ काढत आहेत. एप्रिल महिन्यात कामठी आणि कन्हान या भागातच कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. मात्र हे दोन्ही रुग्ण उपचारानंतर बरे झाले. परंतु शासनाने बाहेरील राज्यात अडकलेल्या नागरिकांना आपल्या मूळ गावी परत येण्याची मुभा दिल्यामुळे रुग्णांच्या संख्येत आता वाढ होत आहे. जिल्ह्यातील कामठी, कन्हान, खरबी, बुटीबोरी, दुधाळा (कोंढाळी), दहेगाव रंगारी (सावनेर), सोनोली (कळमेश्वर), मन्नाथखेडी (नरखेड), गुमगाव (हिंगणा), कोराडी येथेही आता कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाची दहशत पसरत आहे. अशात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे.शासकीय कार्यालयात भीतीचे वातावरणग्रामीण भागातून मोठ्या संख्येने जनता जिल्हा परिषदेत येते. सध्या जिल्हा परिषदेत बहुतांश योजनांची अंमलबजावणी थांबवली आहे. परंतु दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी दलित वस्तीचे प्रस्ताव, त्या संदर्भातील चौकशीसाठी नागरिक जिल्हा परिषदेत येत आहेत. लोकप्रतिनिधीसुद्धा दलित वस्तीच्या कामांसाठी गर्दी करीत आहेत. मात्र ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. जिल्हा परिषदेत सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. परंतु ग्रामीण भागातून होत असलेली गर्दी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईPuneपुणे