शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सुवर्णपदकाची चौकशी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 22:03 IST

सुवर्णपदकासंदर्भात नेमका घोळ कसा झाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ : गुणवंत विद्यार्थिनीला ‘एमएड’ऐवजी मिळाले ‘बीएड’चे सुवर्णपदक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारंभादरम्यान सुवर्णपदकांच्या संभ्रमामुळे प्रशासकीय डोकेदुखी वाढली आहे. ‘एमएड’मध्ये सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळविणाऱ्या विद्यार्थिनीच्या सुवर्णपदकावर चक्क ‘बीएड’ची नोंद करण्यात आल्याच्या मुद्यावर सोमवारी विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. संबंधित सुवर्णपदकासंदर्भात नेमका घोळ कसा झाला याची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर विद्यापीठ वर्तुळात सुवर्णपदकाचीच चर्चा होती.नागपूर विद्यापीठात दानदात्यांकडून आलेल्या निधीतून विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिके देण्यात येतात. ‘एमएड’ परीक्षा प्रथम प्रयत्नांत उत्तीर्ण करून सर्वात जास्त ‘सीजीपीए’ मिळविल्याबद्दल सुयश कॉलेज आॅफ एज्युकेशनच्या प्रियंका दुबे-तोडकर यांना पाच सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. यात डॉ.जी.एस.पाराशर, विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षणविभाग रजत महोत्सव सुवर्णपदकाचादेखील समावेश होता. परंतु ‘एमएड’ अभ्यासक्रमाऐवजी यावर ‘बीएड’ची नोंद होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्र-कुलगुरू डॉ.येवले यांनी तत्काळ परीक्षा विभागातील अधिकाºयांना यासंदर्भात विचारणा केली. पदकांसंदर्भातील सर्व यादी परीक्षा विभागात तयार होते व ती पदकविजेत्यांच्या नावासह कंत्राटदाराला देण्यात येते. त्यामुळे या पदकाबाबत नेमका कुठे घोळ झाला हे शोधण्याची सूचना परीक्षा विभागाला दिली आहे. तसेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांच्याशी या मुद्यावर चर्चादेखील झाली असल्याचे डॉ.येवले यांनी सांगितले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर