लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय उद्योगांच्या कथा जगासमोर मांडण्याची हीच योग्य वेळ असून भारतीय उद्योगांच्या केस स्टडीज् जागतिक व्यवस्थापन विचारसरणीत आमूलाग्र बदल घडवू शकतात,” असे प्रतिपादन के. एस. चीमा ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक के. एस. चीमा यांनी येथे केले.
भारतीय प्रबंध संस्थान नागपूर (आयआयएम नागपूर) येथे आयआयएम नागपूर केस स्टडी सर्कलतर्फे शनिवारी आयोजित दुसऱ्या केस अँड रिसर्च परिषदेच्याच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ही आंतरराष्ट्रीय परिषद आयआयएम नागपूरच्या परिसरात आयोजित करण्यात आली आहे. याप्रसंगी आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री, आयआयएम नागपूरचे शैक्षणिक उपक्रमाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत गुप्ता, प्राध्यापक डॉ. यतीश जोशी, आयोजक अध्यक्ष प्रा. राकेश गुप्ता उपस्थित होते.
आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री यांनी सांगितले की, “भारत आता आपले व्यवस्थापन ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय उद्योगाच्या कथा, नेतृत्वाचे अनुभव आणि नवा विचार आता आपल्या स्वतःच्या केस रिसर्चच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचतील.”आयोजक अध्यक्ष प्रा. राकेश गुप्ता म्हणाले,सेंटरतर्फे व्यवस्थापन क्षेत्रातील अग्रगण्य केस स्टडी लेखक सहभागींना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे भारतात स्वतःच्या केस स्टडी लिहिणारी नवी पिढी तयार होण्यास मदत होणार आहे. परिणामी, भारतीय उद्योगांवर आधारित केस स्टडीज जागतिक पातळीवर पोहोचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देश-विदेशातील व्यवस्थापन तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग
आयआयएम नागपूरकडे स्वतःचे केस स्टडी सेंटर असून, असे केंद्र असलेले आयआयएम नागपूर हे देशातील तिसरे आयआयएम आणि नव्या पिढीतील पहिले आयआयएम आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील केस स्टडीज् प्रकाशानंतर जगात आघाडीवर असलेल्या कॅनडाच्या आयव्ही पब्लिशिंग या संस्थेच्या सहकार्याने ही केंद्र चालवले जाते. हे केंद्र भारतीय उद्योग आणि धोरणात्मक संदर्भांवर आधारित जागतिक दर्जाच्या केस स्टडी विकसित करते आहे. या सेंटरच्या माध्यमातून आयोजित आंतरराष्ट्रीय केस रिसर्च परिषदेला देश-विदेशातील व्यवस्थापन तज्ज्ञ, प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी सहभागी झाले आहेत. परिषदेसाठी ६०० हून अधिक ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी प्राप्त झाल्या आहेत.
Web Summary : K. S. Cheema emphasized showcasing Indian industrial case studies globally at IIM Nagpur's conference. IIM Nagpur's director highlighted India's readiness to share management knowledge. The center aids in creating indigenous case studies, attracting global experts and students, fostering a new generation of case study writers.
Web Summary : के. एस. चीमा ने आईआईएम नागपुर के सम्मेलन में भारतीय औद्योगिक केस स्टडीज को विश्व स्तर पर प्रदर्शित करने पर जोर दिया। आईआईएम नागपुर के निदेशक ने प्रबंधन ज्ञान साझा करने के लिए भारत की तत्परता पर प्रकाश डाला। केंद्र स्वदेशी केस स्टडी बनाने में मदद करता है, वैश्विक विशेषज्ञों और छात्रों को आकर्षित करता है, और केस स्टडी लेखकों की एक नई पीढ़ी को बढ़ावा देता है।