शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

नागपुरात  थर्टी फर्स्टचा तगडा बंदोबस्त : धुडगुस घालणाऱ्यांची तुरुंगात जाणार रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 23:09 IST

जुन्या वर्षातील वादातून धुडगुस घालणाऱ्यांना नव्या वर्षाची सकाळ तुरुंगात काढावी लागू शकते. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली.

ठळक मुद्दे४५०० पोलीस तैनात, हॉटेल्स-पबवर करडी नजर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जुन्या वर्षातील वादातून धुडगुस घालणाऱ्यांना नव्या वर्षाची सकाळ तुरुंगात काढावी लागू शकते. थटी फर्स्टला धुडगुस घालणाऱ्यांनी नागरिकांच्या जिविताला कोणत्याही प्रकारचा धक्का पोहोचविल्यास किंवा छेडखानी केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अधिकाऱ्यांसह ४५०० पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी अधिकाऱ्यांशी बंदोबस्ताबाबत चर्चा केली. 

मंगळवारी मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उपराजधानी सजली आहे. हॉटेल्स, बार, पबमध्ये पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. येथे विदेशी बालांना बोलाविण्यात आल्याची चर्चा आहे. याशिवाय युवकांनी देखिल विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले आहे. रात्रभर चालणाऱ्या या पार्ट्यांची पोलिसांनाही माहिती मिळणार अशी योजना आखली आहे. या पार्ट्यांमध्ये मादक पदार्थांचे सेवन करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या घटनांकडे पाहून पोलिसांनी सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त केला आहे. मॉल, फुटाळा तलाव, गर्दीची ठिकाणे तसेच सदर, धरमपेठ, शंकरनगरात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. छेडखानीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी महिला पथक तैनात करण्यात आले आहेत. महिला साध्या वेषात गर्दीच्या ठिकाणी कर्तव्य बजावणार आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाशिवाय ठाण्यातील पथकेही छेडखानी करणाºयांवर नजर ठेवणार आहेत. भांडणे आणि इतर बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी हॉटेल, पबवर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या वर्षाच्या जल्लोषात असामाजिक तत्व जुन्या वैमनस्यातून भांडणे करतात. त्यामुळे गुन्हेगारांची सोमवारी रात्रीपासूनच धरपकड सुरु करण्यात आली आहे. जुगार, सट्टा आणि दारु विक्रीशी निगडीत गुन्हेगारांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. शहरात ७५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. दरम्यान वाहनांची तपासणी करण्यात येईल. १५० बीट मार्शल आणि गुन्हे शाखेचे १२ पथक शहराच्या कानाकोपऱ्यात गस्त घालणार आहेत. पोलिसांनी बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दलालाही तैनात ठेवले आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्तक राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी पोलीस आयुक्तांपासून शिपायापर्यंत सर्वजण रस्त्यावर उतरून कडेकोट बंदोबस्त करणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसNew Yearनववर्ष