शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

नागपुरात लॉकडाऊनच्या काळात १३ दुचाकीस्वारांचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:29 IST

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले.

ठळक मुद्देसात महिन्यात ३०३ अपघात : ४४ दुचाकीस्वारांचा मृत्यूमृतांमध्ये विना हेल्मेट चालकांची संख्या अधिक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच वाहनांना रस्त्यावर येण्यास मंजुरी देण्यात आली होती, असे असताना मार्च ते मे या तीन महिन्यात १३ दुचाकीस्वारांचे अपघातात मृत्यू झाले. विशेष म्हणजे, जानेवारी ते जुलै या काळात ३०३ अपघात झाले. त्यात ९१ प्राणांतिक अपघात झाले असून ४४ दुचाकीस्वारांचा समावेश होता. यातील बहुतांश चालकांनी हेल्मेट घातले नसल्याचे किंवा हेल्मेटचा दर्जा योग्य नसल्याचे समोर आले आहे.नागपूर शहरात २०१८ मध्ये १११७ अपघात झाले. यात २३७ जणांचा मृत्यू व ११८७ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ९४० अपघात, ३४० मृत्यू व ९८१ व्यक्ती जखमी झाल्या. जिल्ह्यात एकूण २०५७ अपघात, ५७७ मृत्यू व २१६८ जखमी झाले. २०१९ मध्ये शहरात १००७ अपघातात २५० मृत्यू तर १०४२ जखमी झाले. ग्रामीणमध्ये ८४३ अपघात, ३८४ मृत्यू व ९५० जखमी झाले. जिल्ह्यात एकूण १८५० अपघात, ६३४ मृत्यू व १९९२ जखमी झाले. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये २०७ अपघात कमी झाले असले तरी शहर आणि ग्रामीणमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यावर्षी जानेवारी ते जुलै महिन्यात ३०३ अपघात झाले आहेत.मार्चमध्ये ५, एप्रिलमध्ये २ तर मेमध्ये ६ दुचाकीस्वारांचा मृत्यूजानेवारी महिन्यात ७, फेब्रुवारी महिन्यात १४, मार्च महिन्यात ५, एप्रिल महिन्यात २, मे महिन्यात ६, जून महिन्यात ६ तर जुलै महिन्यात ४ दुचाकीस्वारांचे प्राणांतिक अपघात झाले. यात लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात झालेल्या अपघातात १३ दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला.वेगाने वाहन चालविणे हे अपघातांचे कारणवाहतुकीच्या नियमांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, वाहतुकीसाठी निर्देशित वेगमर्यादेचे उल्लंघन करणे किंवा रस्त्यावरील स्थिती न पाहता वेगाने वाहन चालविणे हे जवळपास १/३ जीवघेण्या अपघातांचे कारण असते. अतिवेगामुळे अपघात टाळण्यास कमी वेळ मिळतो, अपघाताची शक्यता वाढते व अपघात झाल्यास त्याची तीव्रताही वाढते. यातच हेल्मेट न घालता किंवा बोगस कंपन्यांचे अयोग्य हेल्मेट घालून दुचाकी चालवित असताना अपघात झाल्यास गंभीर दुखापत होण्याची शक्यता अधिक पटीने वाढते.अपघात निश्चितच टाळता येण्यासारखेमागील वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकारचे अपघात मिळून २६८ अपघात कमी झाले आहेत. जुलै २०१९ मध्ये १३५ प्राणांतिक अपघात झाले होते. त्या तुलनेत जुलै २०२० मध्ये ९१अपघात झाले आहेत. ४४ अपघात कमी झाले आहेत. परंतु अपघात मुक्त शहर करण्यासाठी प्रत्येकाने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.विक्रम साळी,पोलीस उपआयुक्त (वाहतूक)

टॅग्स :Accidentअपघातnagpurनागपूर