शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात साडेतेरा लाखांच्या साबणांची हेराफेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 02:09 IST

ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्ट कंपनीसाठी साबण पोहचविणाऱ्या ट्रकचालकाने १३ लाख ५० हजार रुपये किमतीचे साबणच गायब केल्याचा प्रकार घडला.वाडी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीने हंसापुरी रोड येथे राहणाऱ्या ट्रकचालक प्रेमशंकर गौर (३०) याच्या माध्यमातून ठाण्यावरून भिवंडीला १३ लाख ५० हजार रुपयांचे साबण पाठविले होते. ट्रक क्रमांक एम.एच./०४/एच.वाय./४०२२ मधून हा माल पाठविण्यात आला होता. मात्र ट्रकचालक गौर याने साबणांची हेराफेरी करून ट्रक औरंगाबादला बेवारस सोडला. त्यानंंतर तो फरार झाला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रोख रकमेसह ३.७५ लाखाची चोरीघराचे काम सुरू असल्याने किरायाच्या घरामध्ये ठेवलेली रोख आणि पावणेचार लाख रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली. ही घटना गड्डीगोदाम वस्तीमधील चुडी गल्लीत घडली.विजया अविनाश पिल्लेवान यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. विजया यांनी घराचे साहित्य ठेवण्यासाठी परिसरातीलच एक खोली किरायाने घेतली होती. तिथे असणाऱ्या आलमारीमध्ये त्यानी सव्वादोन लाख रुपये आणि दागिने ठेवले होते. त्या आपल्या भावाच्या घरी राहत होत्या. सोमवारी रात्री अज्ञात आरोपीने घराचे कुलूप तोडून रोख रक्कम आणि दागिने चोरून नेले. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.३६ हजारांनी फसवणूकसायबर गुन्हेगारांनी लिंक डाऊनलोड करण्याचे सांगून एका व्यक्तीची ३६ हजार रुपयांनी फसवणूक केली.हिंगणा येथे राहणारे सतीश बन्सोड यांना अज्ञात व्यक्तीचा कॉल आला. त्या व्यक्तीने आपण पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी कॉल केल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने एक लिंक पाठविली. ती डाऊनलोड करण्यास सांगितले. संबंधित लिंक डाऊनलोड करताच त्याच्या एसबीआय बँकेच्या खात्यामधून ३६ हजार रुपये काढले गेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हिंगणा पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी धोकेबाजी तसेच आयटी अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी