शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

नागपुरात   ४८ तासात हत्येचा तिसरा थरार :  खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 23:41 IST

The third tremor of murder in 48 hours in Nagpur, crime news एमआयडीसी आणि हिंगण्यात घडलेल्या हत्येच्या चर्चेला पूर्णविराम बसायचा असतानाच सोमवारी रात्री प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हत्येची तिसरी घटना घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे. विविध भागात ४८ तासात तीन हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएमआयडीसी, हिंगणा अन् प्रतापनगर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसी आणि हिंगण्यात घडलेल्या हत्येच्या चर्चेला पूर्णविराम बसायचा असतानाच सोमवारी रात्री प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही हत्येची तिसरी घटना घडली. अनिल पालकर असे मृताचे नाव आहे. विविध भागात ४८ तासात तीन हत्या झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

४८ वर्षीय अनिल पालकर हिंगण्यातील रहिवासी असून ते एका मंगल कार्यालयाचे संचालक होते. गोपालनगरात तिसऱ्या बसथांब्याजवळ पालकरचे मंगल कार्यालय आहे. पालकरच्या इमारतीत कर्नाटकमधील एक बेकरी चालक तसेच शाहू नामक किराणा दुकान भाडेकरू आहेत. किराया वाढवण्याच्या वादातून पालकर दारूच्या नशेत त्यांना रोज शिवीगाळ करायचे. त्यामुळे या दोन भाडेकरूंसोबत त्यांचा नेहमी वाद व्हायचा. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास पालकर या दुकानापुढे जाऊन बरळू लागले. त्यामुळे दोन्ही दुकानातील नोकर समोर आले. तेथे त्यांचा एका महिलेशी वाद झाल्यानंतर दोन आरोपी पालकर यांच्यावर धावून आले. त्यांनी चाकूचे घाव घालून त्यांची हत्या केली. यामुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. माहिती कळताच प्रतापनगरचे ठाणेदार भीमराव खंदाळे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. पोलीस उपायुक्त हसन नुरूलही घटनास्थळी पोहचले. आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली. काही वेळेतच एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला. वृत्त लिहिस्तोवर पोलीस त्याची चौकशी करीत होते.

आरोपी किती?

या प्रकरणात दोनच आरोपी आहेत की आणखी त्यांना चिथावणी देणारे कुणी आहेत, त्याचा तपास केला जात आहे. त्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर