शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

तिसऱ्या दिवशीही कोल्ड स्टोअरेजची आग कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 20:34 IST

भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड  स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.

ठळक मुद्देपाचवरून तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर आग पसरली : नियंत्रणाची व्यवस्था नसल्याने आगीचा भडका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भंडारा मार्गावरील कापसी-महालगाव परिसरात असलेल्या सुरुची मसालेच्या पाच मजली कोल्ड  स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास लागलेली आग बुधवारी तिसऱ्या दिवशीही धुमसत आहे. कोल्ड स्टोअरेजच्या पाचव्या मजल्याला लागलेली आग चौथ्या व तिसऱ्या मजल्यापर्यंत आली आहे. आगीमुळे बांधकामासाठी वापरण्यात आलेले स्टील व लोखंड वितळत असल्याने इमारत धोकादायक झाली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी बाजूच्या दुसऱ्या गोदामात पोहोचलेली आग आटोक्यात आली आहे.कापसी खुर्द येथील सुरुचीचे हे स्टोअरेज महामार्गाला लागून आहे. १.४ एकर परिसरात हे विस्तारले असून, पहिल्या पाच माळ्याच्या स्टोअरेजमध्ये हजारो मिरची पोती भरून ठेवली होती. पाचव्या, चौथ्या व तिसऱ्या माळ्यांपर्यंत ही आग पसरली आहे तर, दुसरे स्टोअरेज चार माळ्यांचे आहे. येथे मंगळवारी आग पसरली होती. आगीत आतमध्ये असलेल्या मसाले बनविण्यासाठीची सर्व सामग्रीची पोती जळाली. बुधवारी ही आग आटोक्यात आली आहे. मात्र पाच माळ्यांच्या स्टोअरेजमधील आग आटोक्यात येणे शक्य नाही. ती आणखी काही दिवस राहील. ही इमारत धोकादायक झाली आहे. आग आटोक्यात आल्यानंतर इमारत पडली नाही तरी तिचा वापर धोकादायक असल्याने ती जमीनदोस्त करावी लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.दुसऱ्या कोल्ड स्टोअरेजच्या इमारतीत आग विझविताना मंगळवारी वाहनचालक डी. बी. बिनीकर, आर. डी. पवार, योगेश खोडके आणि रोशन कावळे हे चार जण जखमी झाले. या सर्वांना तातडीने पारडी भागातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील बिनीकर यांच्या हाताची कातडी भाजल्याने त्यांना क्रिम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.फायर फायटिंगची यंत्रणा नाहीपाच मजली कोल्ड स्टोअरेज उभारताना येथे करण्यात येणारा मालाचा साठा विचारात घेता सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीत फायर फायटिंग, पाण्याचा मारा करण्यासाठी स्प्रिंकलर्स बसविणे आवश्यक होते. ही यंत्रणा असती तर स्टोअरेजला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणणे शक्य झाले असते. परंतु स्टोअरेज मालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. आता ती शक्य नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.धोकादायक इमारतीच्या यादीतअग्निशमन विभागातर्फे १ सप्टेंबर २०१४ रोजी या परिसराची तपासणी करण्यात आली होती. यात इमारतीत आगप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने, त्यावेळी स्टोअरेज मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. यासाठी २६ सप्टेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली होती. नोटीसकडे दुर्लक्ष केल्यानेच ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली होती. विभागाने यासंदर्भात नागपूर महानगर विकास प्राधिकरण व कापसी खुर्द पंचायत समितीलाही कळविले होते. यात पाणी व वीज तोडावी, अशी सूचना केली होती. तर, विभागाने दिलेल्या नोटीसला स्टोअरेज मालकाने न्यायालयात आव्हान देऊन स्थगनादेश मिळविला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने अग्निशमन विभागाला कारवाई करता आलेली नाही१५ लाख लिटर पाण्याचा मारासध्या घटनास्थळी कळमना व सक्करदरा येथील चार बंबांसह टीटीएलतर्फे पाण्याचा मारा करण्यात येत आहे. स्टोरेज परिसरात हायड्रंन्ट असल्याने आग विझविण्यास लागत असलेले पाणी उपलब्ध आहे. किमान दोन लाख लिटर पाणी क्षमता येथे आहे. तसेच आसपासच्या परिसरातूनही पाणी उपलब्ध असल्याने इमारतीवर सातत्याने पाण्याचा मारा करण्यात येत आहे. तीन दिवसात १५ लाख लीटरहून अधिक पाण्याचा मारा करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके आग नियंत्रणाच्या प्रयत्नात असून बुधवारी अग्निशमन विभागाचे उपमुख्य अग्निशमन अधिकारी बी.पी. चंदनखेडे व विभागाचे अधिकारी व कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :fireआगnagpurनागपूर