शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलच्या १० ‘एसीं’वर चोरांचा डल्ला; कॉईल चोरी वाढली, ‘ट्रॉमा’नंतर आता मेडिकलमध्ये चोऱ्या

By सुमेध वाघमार | Updated: February 27, 2024 19:46 IST

मंगळवारी मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहात लावण्यात आलेल्या सहा ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याचे पुढे आले.

नागपूर: मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमधील चार वातानुकुलीत यंत्रातील (एसी) तांब्याच्या कॉईल चोरीची घटना ताजी असताना आता मेडिकलच्या ‘एसी’चा कॉईलवरही चोरट्यांची नजर गेली आहे. मंगळवारी मेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहात लावण्यात आलेल्या सहा ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याचे पुढे आले. या महिन्यात जवळपास दहा एसींंवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने रुग्णालयाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये अतिदक्षता विभागापासून ते शस्त्रक्रिया गृहात व वॉर्डातही ‘एसी’ लावण्यात आले आहे. परंतु त्याच्या देखरेखीकडे फारसे लक्ष नाही. यामुळे बहुसंख्य ‘एसी’ बंद आहेत. याचाच फायदा घेत या महिन्याच्या सुरूवातीला सलग तीन दिवस ‘ट्रामा’मधील ‘एसी’चे कॉईल चोरण्याची घटना घडली. मात्र मेडिकल प्रशासनाला याची माहिती घेऊन पोलिसांत तक्रार करण्यास बराच वेळ गेला. ही घटना ताजी असताना आता मेडिकलच्या सहावर ‘एसी’चे कॉईल चोरीला गेल्याची तक्रार आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर ‘एसी’ बंद पडल्याने रुग्णांसोबतच डॉक्टरांची गैरसोय होत आहे. 

‘एसी’ बंद पडल्यावर चोरीची घटना उघडकीसमेडिकलच्या शस्त्रक्रिया गृहातील ‘एसी’ बंद असल्याची तक्रार बांधकाम विभागाकडे आल्यावर त्यांनी तपासणी केली. त्यावेळी कॉईल चोरीला गेल्याचे उघडकीस आले. या घटनेची गंभीर दखल अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी घेतली. त्यांनी सुरेक्षेची जबाबदारी असलेल्या ‘महाराष्टÑ सुरक्षा बल’ाच्या जवानांची कानउघाडणी केल्याचे समजते.

टॅग्स :nagpurनागपूरtheftचोरी