शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

इतवारीत चोरांचा धुमाकूळ : चार दुकानात २.८५ लाखांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:05 IST

चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चोरांनी मंगळवारी रात्री व्यावसायिक क्षेत्र इतवारीतील चार दुकानांमध्ये चोरी करून २.८५ लाख रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गांधीबाग बगीच्याजवळ हॅण्डलूम मार्केट आहे. माहितीनुसार रात्री सुमारे २.४० वाजता चोरांनी विनोद हुडिया यांची श्रीकृष्ण साडी शोरूम, गोपाल मुलतानी यांचे मिलिंद टेक्साटाईल्स, रमेश कुंगवानी यांचे पार्वती टेक्सटाईल्स आणि एका बंद दुकानात चोरी केली. चारही दुकाने जवळजवळ आहेत. हुडिया यांच्या दुकानातील कपाटामधून १.५० लाख, मुलतानी यांच्या दुकानातून १.३५ लाख आणि कुंगवानी यांच्या दुकानातून २५०० रुपये चोरीला गेले आहेत. चौथ्या दुकानात चोरांना काहीही मिळाले नाही.सकाळी ५ वाजता मार्केटच्या चौकीदाराला दुकानाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी व्यापाºयांना सूचना दिली. त्यांनी दुकानात पोहोचून पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती होताच मार्केटमधील व्यापारी गोळा झाले. त्यांनी आरोपींना अटक करण्याची आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी केली.घटनेची माहिती मिळताच तहसील ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. गांधीबाग निवासी परिसर आहे. या भागात रात्रीपर्यंत लोकांची ये-जा असते; शिवाय तहसील पोलीस ठाणे जवळच आहे. या भागात पोलिसांची गस्त असते. व्यापाºयांनी निगराणीसाठी चौकीदार नियुक्त केला आहे. अशास्थितीत चोरीची घटना आश्चर्यकारक आहे. पहाटे ३ पर्यंत सर्व दुकानांचे कुलूप लागले होते, असे चौकीदाराचे मत आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीमध्ये रात्री २.४० वाजता एक संदिग्ध कार घटनास्थळी आल्याचे दिसून येत आहे. कार २.५८ वाजता रवाना झाली. तहसील पोलीस कारचा शोध घेत आहेत. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर