शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

घरात घुसून वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटले, परिसरात खळबळ

By योगेश पांडे | Updated: June 7, 2023 17:30 IST

अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद

नागपूर : भरदिवसा दोन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून एका वृद्धेच्या अंगावरील दागिने लुटत पळ काढला. या प्रकारामुळे वृद्धेला धक्का बसला व भितीमुळे तिच्या तोंडातून शब्ददेखील फुटू शकले नाही. बराच तास ती एकाच जागेवर पडून राहिली. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

चंद्रकला मधुकर उईके (६०, जाटतरोडी) असे संबंधित महिलेचे नाव आहे. मंगळवारी त्यांची दोन्ही मुले, सुना कामावर निघून गेले. तर पती वीजेचे देयक भरण्यासाठी दुपारी १२ वाजता बाहेर गेले. चंद्रकला या घरीच होत्या व दरवाजा लोटून बसल्या होत्या. अडीच वाजताच्या सुमारास दोन जण दरवाजा उघडून आत आले व त्यांनी पतीने आदल्या दिवशी किती पेंशन घरी आणली अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जबरदस्तीने चंद्रकला यांचे मंगळसूत्र व कर्णफुले असे सुमारे ३५ हजारांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर त्यांनी चंद्रकला यांना धमकी देत धक्का दिला.

चंद्रकला यांना मधुमेह असून या प्रकारामुळे त्या दहशतीत आल्या. त्यांच्या गळ्यातून आवाजदेखील निघू शकला नाही व पायात त्राणच उरले नाही. त्या बरेच तास एकाच जागी झोपून होत्या. सायंकाळी कुटुंबिय घरी आल्यावर ही घटना समोर आली. चंद्रकला यांना घेऊन कुटुंबियांनी इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या तक्रारीवरून दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीnagpurनागपूर