लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विवाह जाेडून देण्याचे आमिष दाखवून लग्नाळू मुला-मुलींना फसविण्याचे प्रकार दरराेज समाेर येतात. अशाच एका पीडिताची तक्रार समाेर आली आहे. नाशिक स्थित विवाह संस्थेने माेबाईलवर मुलींचे फाेटाे पाठविले व पैसे भरण्यास सांगितले. पैसा भरताच संस्थेचे लाेक ‘नाॅट रिचेबल’ झाले.नागपूर निवासी ४३ वर्षीय संदीप यांनी याबाबतची तक्रार हुडकेश्वर पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार आईची प्रकृती आणि वय निघून जात असल्याने ते लग्नासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान २३ मे राेजी वर्तमान पत्रातील विवाह विषयक या मथळ्याखाली ‘वर पाहिजे’ या जाहिरातीच्या आधारे मुलीच्या वर्णानावरून संदीप यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क केला. त्यानुसार नाशिक येथील ‘स्वप्नपूर्ती जाेडी डाॅट काॅम’ या विवाह सुचक मंडळातून दीपाली माेरे उर्फ शीतल जाधव या महिलेशी संपर्क झाला. त्यांच्या सुचनेनुसार संदीप यांनी माेबाईलवर फाेटाेसह स्वत:चा बाॅयाेडाटा पाठविला.
शीतल जाधव या महिलेनेही तीन-चार मुलींचे फाेटाे पाठविले. त्यातील एकीची संदीपने निवड केली. हा संपूर्ण संवाद २४ ते २६ मे पर्यंत चालला. पुढे मुलगी दाखवायचा कार्यक्रम निश्चित करू, पण त्यापूर्वी संस्थेत नाेंदणी करावी लागेल, अशी सूचना केली. त्यानुसार संदीपने २६ मे राेजी ३००० रुपये फाेन-पे द्वारे प्रवीण साेनवाने या व्यक्तिच्या नावावर संस्थेच्या खात्यावर पाठविले. पैसे मिळाल्यानंतर एक-दाेन तासात संदीपने पसंत केलेल्या उमरेडला राहणाऱ्या मुलीचा पत्ता पाठविताे, असे सांगितले. हा शेवटचा संवाद. त्यानंतर त्यांचा फाेनच बंद झाला. संदीपने आठवडाभर वेगवेगळ्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे संदीपच्या लक्षात आले. आपल्यासारखे असंख्य तरूण विवाहासाठी प्रयत्न करतात. त्यांचीही अशाप्रकारे फसवणूक हाेत असेल. लाेकांना गंडा घालणाऱ्या या रॅकेटवर कारवाई व्हावी, अशी मागणी संदीपने केली आहे.