शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तर सेवेतून मुक्त करा : अनुसूचित जाती कल्याण समितीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 22:34 IST

अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. जे कर्मचारी प्रमाणपत्र सादर करू शकण्यास असमर्थ आले, त्यांना सेवेतून मुक्त करा, असे निर्देश अनुसूचित जाती कल्याण समितीने दिले.

ठळक मुद्देशासकीय कार्यालयातील रोस्टर तयार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जाती प्रवर्गातून नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांनी जातपडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही. जे कर्मचारी प्रमाणपत्र सादर करू शकण्यास असमर्थ आले, त्यांना सेवेतून मुक्त करा, असे निर्देश अनुसूचित जाती कल्याण समितीने दिले.विधिमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती २३ ते २५ जानेवारी दरम्यान नागपूर दौऱ्यावर होती. समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, समाजकल्याण, महावितरण आदी कार्यालयाला भेटी देऊन अनुसूचित जातीच्या वर्गातील रिक्त जागा, पदभरती, पदोन्नती संदर्भातील माहिती घेतली. पदभरती, पदोन्नती आणि रिक्त जागेसंदर्भातील रोस्टर अनेक विभागाकडून अद्याप तयार करण्यात आलेले नाही. रोस्टर अद्ययावत करून महिन्याभराच्या आत माहिती सादर करण्यासोबत जात पडताळणीचे अर्ज तीन महिन्यात निकाली काढण्याचे निर्देश दिल्याचे समितीचे अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांनी पत्रपरिषदेत सांगितले. जवळपास सर्व विभागांमध्ये रोस्टर अद्याप नाही. त्यामुळे सर्व विभागांना ते अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जात पडताळणीचे अर्ज अनेक दिवसापासून प्रलंबित आहे. यामुळे होणारी अडचण लक्षात घेता तीन महिन्यात सर्व अर्ज निकाली काढा. यासाठी शिबिर घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनुसूचित क्षेत्रात निधी खर्च करण्यात काही विभाग मागे आहे. महानगर पालिकेने मागील वर्षाचा निधी कमी खर्च केला असून यंदा मात्र अतिरिक्त खर्च केल्याचे सांगितले. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या कामावर समाधान व्यक्त केले. यावेळी आमदार प्रकाश गजभिये, मिलिंद माने, जोगेंद्र कवाडे, राजू तोडसाम, गौतम चाबूकस्वार, लखन मलिक, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. समाजकल्याण विभागाचे वानाडोंगरी येथील वसतिगृहाची समितीकडून तोंडभरून प्रशंसा करण्यात आली. वानाडोंगरीच्या वसतिगृहाप्रमाणे इतर सर्वच वसतिगृहाचा विकास करण्याच्या सूचना त्यांनी समाजकल्याण अधिकाऱ्यांना केल्या. वॉर्डन सुधीर मेश्राम यांच्या अभिनंदनाचा ठराव समितीकडून सर्वानुमते पारित करण्यात आला. त्याचबरोबर समितीने नागपूर जिल्ह्यातील काम समाधानकारक असल्याचे सांगितले. आयटीआयच्या प्राचार्याची निलंबनाची शिफारसइंदोरा येथील समाजकल्याणच्या अनुसूचित जाती, नवबौद्ध मुलामुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची समितीने पाहणी केली असता, नाराजी व्यक्त केली. जागेवर होत असलेले अतिक्रमण, कोट्यवधीचे धूळखात असलेले यंत्र, अभ्यास वर्ग, घाणीबाबत समितीने प्राचार्य टी. जी. औताडे यांना चांगलेच धारेवर धरले. औताडे यांची दोन वेतनवाढ रोखण्यासोबतच त्यांच्या निलंबनाची शिफारस शासनाकडे समिती करणार आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्रnagpurनागपूर