शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

-ते करताहेत मूक प्राण्यांची तृष्णातृप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 12:04 IST

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे.

ठळक मुद्देपुलक जन चेतना मंचचा उपक्रमठिकठिकाणी ठेवले जाताहेत पाण्याचे टाके

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यामध्ये अनेक सामाजिक संस्था पाणपोई सुरू करतात. त्यामुळे सोबत पाणी न घेता घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींना तहान भागविण्यासाठी जास्त भटकंती करावी लागत नाही. त्यांना कोणत्याही ठिकाणी सहज पाणी मिळून जाते. अशी सोय मूक प्राण्यांसाठीही करणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेता अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. आतापर्यंत विविध वस्त्यांमध्ये २५ टाके ठेवण्यात आले आहेत. टाके नि:शुल्क दिले जात आहेत.शरद मचाले, कुलभूषण डहाळे, नरेश मचाले, रमेश उदेपूरकर, अनंत शिवणकर व प्रकाश उदेपुरकर हे या उपक्रमाचे संयोजक आहेत. मूक प्राण्यांची सेवा हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे हा सेवाभाव जपण्याची मनातून इच्छा असणाऱ्यांनाच या संस्था टाके देत आहे. तसेच, संस्थांचे कार्यकर्ते वस्त्यावस्त्यांमध्ये फिरून इच्छुक व्यक्तीच्या घरापुढे टाके ठेवत आहेत. टाक्यात पाणी भरणे व टाक्याची नियमित सफाई करणे ही जबाबदारी संबंधित व्यक्तीकडे सोपविली जात आहे. व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपक्रमाचा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुलक सागर महाराज यांच्या जन्मदिवसापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड येथील शाखा कार्यालयापुढे पहिले पाण्याचे टाके ठेवण्यात आले. त्यानंतर रमणा मारोती, शेषनगर, तुळशीबाग, झेंडा चौक महाल, गणेशपेठ, बजाजनगर इत्यादी वस्त्यांमध्ये टाके देण्यात आले. हा उपक्रम यशस्वी सिद्ध होत आहे. गायी, म्हशी, कुत्रे, बकºया इत्यादी मूक प्राणी टाक्यातील पाणी पिऊन तृष्णा तृप्त करीत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई