शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीसाठी घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:51 IST

औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.

ठळक मुद्देमान्यवरांचे प्रतिपादन : ‘औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीची राखरांगोळी करते काय?’ परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औष्णिक वीज केंद्रातील राखेत जमिनीला मारक घटक मोठ्या प्रमाणात आहेत. या राखेमुळे शेती निरुपयोगी होत असून ही राख शेतीसाठी घातक आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.कृषी विकास प्रतिष्ठानतर्फे शंकरनगर चौकातील श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात ‘औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीची राखरांगोळी करते काय?’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी होते. व्यासपीठावर शेतकरी चळवळीचे नेते प्रा. शरद पाटील, पर्यावरणतज्ज्ञ सुधीर पालीवाल, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद पवार उपस्थित होते. प्रा. शरद पाटील म्हणाले, शेतीची माती सछिद्र असते. शेत पिकांच्या वाढीसाठी या छिद्रातून हवा आणि पाणी मिळते. परंतु औष्णिक वीज केंद्रातील राख शेतीतील छिद्र बुजविते. पहिल्या वर्षी या राखेमुळे चांगले उत्पन्न मिळते. परंतु त्यानंतर या राखेचा वापर केल्यास जमीन निरुपयोगी होते. ही राख विकणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. सुधीर पालीवाल म्हणाले, इंडोनेशियातून भारतात सर्वाधिक कोळसा येतो. इंडोनेशियात या राखेचा वापर केल्यास दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. औष्णिक वीज केंद्रातील राखेचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. डॉ. शरद पवार म्हणाले, औष्णिक वीज केंद्रातील राखेत १० प्रकारचे धोकादायक घटक आहेत. त्याचा मनुष्य आणि प्राण्यांवर दुष्परिणाम होतो. धान्यातून ते आपल्या पोटात जातात. ही राख एवढी घातक असताना त्याचा कोणताच अभ्यास झाला नाही. राख शेतीसाठी घातक आहे की नाही याचा शोध घेऊन तोपर्यंत ही राख शेतीसाठी वापरण्यात परवानगी देऊ नये असे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील छोटा नागपूर या गावात समारंंभपूर्वक शेतकऱ्यांच्या शेतीत राख टाकण्यात आली. राख किती चांगली आहे, हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. पहिल्या वर्षी चांगले पीक आले. त्यानंतर त्या शेतीत काहीच पिकत नाही. शेती खराब करणाऱ्या या राखेचा विरोध करण्यासाठी विदर्भात दबावगट तयार होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गिरीश गांधी यांनी औष्णिक वीज केंद्रातील राख वापरणे घातक असल्याचे सांगून या विरोधात सर्वसामान्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक श्रीराम काळे यांनी केले. संचालन प्रदीप विटाळकर यांनी केले. आभार श्रीधर सोलव यांनी मानले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती