शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'५०,००० जणांना रोजगार मिळणार, त्याची ‘लिस्ट’ही जाहीर करणार'; नितीन गडकरींची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 17:31 IST

नागपूरसह विदर्भातील ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरसह विदर्भातील ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. अनेकदा आपल्या भाषणात ते याचा उल्लेख करीत असतात. शनिवारी सुद्धा एका पत्रपरिषदेत ५० हजार लोकांना रोजगार मिळेलच असे जाहीर करीत याची ‘लिस्ट’च आपण जाहीर करू, असा दावा गडकरी यांनी पुन्हा एकदा केला.नागपुरात खासदार औद्योगिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याची माहिती देण्यासाठी शनिवारी रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉंइट येथे पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्मॉल इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे सांगत क्लस्टरच्या माध्यमातून नागपूर व विदर्भातील लोकांना कसा रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे, याची माहिती दिली. यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा याची आठवण करून दिली की, मी ५० हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे म्हणालो होतो. तो रोजगार उपलब्ध होणारच. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. एकट्या मिहानमध्येच ३३ हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. कुणाकुणाला रोजगार मिळ्राला याची एक लिस्टच आपण जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी