शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पाच दिवस होता पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 22:46 IST

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा रुग्ण ११ ते १५ जूनपर्यंत सीव्हीटीएस विभागात उपचार घेत होता.

ठळक मुद्दे१२ नव्या रुग्णांची नोंद : रुग्णांची संख्या १०७७

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. विशेष म्हणजे हा रुग्ण ११ ते १५ जूनपर्यंत सीव्हीटीएस विभागात उपचार घेत होता. यामुळे अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या जात आहेत. रुग्णालयातील दोघांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन तर ४०वर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मंगळवारी १२ नव्या रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १०७७ झाली आहे.‘सुपर’मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाने ४ जून रोजी बाह्यरुग्ण विभागातून उपचार घेतले. ५ जून रोजी या रुग्णावर एन्जिओग्राफी झाली. ११ जून रोजी सीव्हीटीएस विभागात भरती करण्यात आले. हा रुग्ण १४ जूनपर्यंत भरती होता. १५ नोव्हेेंबर रोजी रुग्णाच्या नातेवाईकांनी स्वत:च्या जबाबदारीवर रुग्णालयातून सुटी घेऊन खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. खासगी हॉस्पिटलने त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार एका खासगी प्रयोगशाळेत नमुने तपासले असता ते पॉझिटिव्ह आले. या घटनेवर विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील म्हणाले, ४०वर डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे नमुने घेतले आहेत. दोघांना क्वारंटाईन केले आहे, तर इतरांना होम क्वारंटाईन सांगितले आहे. रुग्णालयातील प्रत्येक जण सुरक्षेची साधने वापरूनच रुग्णसेवा देतात.दुसऱ्याच दिवशी रुग्णांची संख्या कमीनागपूर जिल्ह्यात सोमवारी ६० रुग्णांची नोंद झाली असताना मंगळवारी रुग्णांची संख्या १२ वर आली. यामुळे आरोग्य यंत्रणेला काही दिलासा मिळाला. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णामध्ये बजेरिया येथील एक तर दुसरा रुग्ण काटोल येथील आहे. एम्सच्या प्रयोगशाळेत चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हिंगणा रोड अमरनगर येथील हे रुग्ण आहेत. हे रुग्ण वनामती येथे क्वारंटाईन होते. मेडिकलच्या प्रयोगशाळेतून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आले. यातील पाच रुग्ण नाईक तलाव, बांगलादेश येथील आहेत. पाचपावली सेंटर येथे हे रुग्ण क्वारंटाइन होते. अमरावती येथून मेडिकलमध्ये भरती झालेला एक रुग्णही पॉझिटिव्ह आला आहे.पाच रुग्णांना डिस्चार्जमेडिकलमधून आज चार रुग्णांना सुटी देण्यात आली. हे सर्व रुग्ण नाईक तलाव, बांग्लादेश येथील आहेत. तर एम्समधून धंतोली येथील एक रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ६५३ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १८६दैनिक तपासणी नमुने २५०दैनिक निगेटिव्ह नमुने २३८नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १०७७नागपुरातील मृत्यू १७डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ६५३डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ३,५७२क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित २,३२८पीडित- १,०७७-दुरुस्त-६५३-मृत्यू-१७

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल