शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत जुन्या कामठी रोडवर पालात राहणाऱ्या भटक्यांना नाही कसलाच आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 20:25 IST

कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन लागण्याला दोन महिने होत असताना कळमना वस्ती, जुना कामठी रोडवर मैदानात पाल टाकून वास्तव्यास असलेले भटके जमातीचे लोक व्याकुळ नजरेने मदतीची आस लावून बसले आहेत.

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊन लागण्याला दोन महिने होत असताना कळमना वस्ती, जुना कामठी रोडवर मैदानात पाल टाकून वास्तव्यास असलेले भटके जमातीचे लोक व्याकुळ नजरेने मदतीची आस लावून बसले आहेत.जळगाव, बुलढाणा, अकोला जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधत नागपूरला आलेले बेलदार समाजाचे हे मजूर ३० पालात राहत आहेत. बालवाडी ते आठवीपर्यंतच्या ८० मुलांसह २२४ लोकांचे वास्तव्य आहे. पुरुष कोणत्याही कामावर जातात तर बायका मुले रस्त्यावर, चौकात मोबाईल कव्हर, हेडफोन, खेळणी विकण्याचे काम करतात. लॉकडाऊन लागले आणि यांच्या अडचणींचा प्रवास अधिक बिकट झाला. भूक सहन न झाल्याने काही दिवस भिकही मागून काढले. दरम्यान संघर्ष वाहिनीच्या कार्यकत्र्यांनी त्यांना अन्नधान्याच्या किट दिल्या. माँ फौंडेशन व गुरुद्वारा कमिटीने अन्न पुरविले. पण त्यांच्या मदतीला मर्यादा आहेत. त्यामुळे संघर्ष वाहिनीने मनपा व जिल्हा प्रशासनाला मदतीची विनंती केली.कुणीही मजूर, गरीब उपाशी झोपू नये, त्यांची सोय करणे हे शासन, प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने २० दिवसानंतर जेवणाची व्यवस्था केली पण तेही एक वेळ आणि त्यातही प्रचंड अनियमितता. त्यामुळे या लोकांना कुचंबणा सहन करावी लागते आहे. प्रशासनाच्या दिरंगाई व दुर्लक्षामुळे या निराधारांच्या जगण्यात अनंत अडचणी आहेत. त्यांचे हाल पाहून स्वयंसेवी संस्थांना १५ मे रोजी पुन्हा धान्याची मदत करावी लागली. मात्र आमच्या मदतीला मर्यादा असून सरकारने त्यांची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन संस्थांतर्फे करण्यात येत आहे.धान्य पुरविण्यातही अपयशीमजुरांजवळ रेशन कार्ड नसले तरी त्यांना जगण्यासाठी धान्य पुरवठा करा असा न्यायालयाचा आदेश आहे. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी या भटक्यांच्या वस्तीतून ६० लोकांचे आधार कार्डही जमा केले. मात्र १७ मे लोटूनही धान्याचा दाणाही त्यांच्या पालात पोहचला नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस