शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोवारींना अनुसूचित जमातीचे लाभ देण्याच्या निर्णयावर स्थगिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:50 IST

गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ लागू करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे गोवारी समाजाला दिलासा मिळाला.

नागपूर  - गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ लागू करण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे गोवारी समाजाला दिलासा मिळाला.यासंदर्भात गडचिरोली जिल्ह्यातील झनकलाल मांगर यांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण व के. एम. जोसेफ यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकाकर्त्याने गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ लागू करण्याच्या निर्णयावर अंतरिमस्थगिती देण्याची विनंती केली.परंतु, न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला. तसेच, आदिवासी गोंड गोवारी सेवामंडळ, राज्य सरकार व इतरांना नोटीस बजावून याचिकाकर्त्याच्या म्हणण्यावर उत्तर सादर करण्यास सांगितले व याचिकाकर्त्याला ही याचिका दाखल करण्यासाठीझालेला विलंब माफ करण्यातआला.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी १४ आॅगस्ट २०१८ रोजी संबंधित निर्णय दिला. महाराष्ट्रामध्ये गोंड-गोवारी अशी स्वतंत्र जमात अस्तित्वात नाही. गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत. गोंड-गोवारी ही गोंड जमातीची उप-जमातही नाही. गोंड व गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत. गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत. त्यामुळे गोवारींना अनुसूचित जमातीचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही, असे निरीक्षण या निर्णयात नोंदविण्यात आले आहे. गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ मिळावे, याकरिता आदिम गोवारी समाज विकास मंडळ, आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळ व इतरांनी याचिका दाखल केल्या होत्या. झनकलाल मांगर यांचा या निर्णयावर आक्षेप आहे. गोवारी समाजाला अनुसूचित जमातीचे लाभ दिले जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.समाज संघटनेद्वारे आनंद व्यक्तसर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे, आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्रचे अध्यक्ष कैलाश राऊत व इतर पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. गोवारी समाजाला यापुढेही अनुसूचित जमातीचे लाभ मिळत राहतील, असे त्यांनी पत्रकाद्वारे कळविले.

टॅग्स :reservationआरक्षणCourtन्यायालय