शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पारडी उड्डाण पूल व नादुरुस्त रस्त्यांवर साधी चर्चाही नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 23:21 IST

रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवसाच्या पावसात मार्गावर पुन्हा खड्डे पडले. पूर्व नागपुरातील सर्वच नागरिक यामुळे त्रस्त आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनाही याची जाणीव आहे. असे असूनही मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत खोपडे यावर काहीच बोलले नाही. गडकरी यांनीच अत्याधुनिक मार्केट व पारडी बाजाराची माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देगडकरी यांनी स्वत: खोपडे यांना पारडी बाजाराची माहिती विचारली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रहदारीचा अडथळा दूर व्हावा, यासाठी पारडी उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु या पुलाच्या कामामुळे सुविधा तर दूरच नागरिक त्रस्त आहेत. पारडी चौकात सर्वत्र खड्डे पडलेले आहेत. औपचारिकता म्हणून काही दिवसापूर्वी डागडुजी करण्यात आली. परंतु दोन दिवसाच्या पावसात मार्गावर पुन्हा खड्डे पडले. पूर्व नागपुरातील सर्वच नागरिक यामुळे त्रस्त आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनाही याची जाणीव आहे. असे असूनही मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या बैठकीत खोपडे यावर काहीच बोलले नाही. गडकरी यांनीच अत्याधुनिक मार्केट व पारडी बाजाराची माहिती जाणून घेतली.पारडी बाजाराचे काय झाले, असा प्रश्न गडकरी यांनी खोपडे यांना केला. खोपडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांकडे इशारा केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकल्पासाठी चार एकर जागेची गरज आहे. महापालिकेने अद्याप ही जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरित केलेली नाही. वन विभाग व खासगी जमिनीमुळे हस्तांतरण न झाल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यावर गडकरी यांनी बाजारासाठी तातडीने जागा निश्चित करण्याचे निर्देश दिले.पारडी बाजाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरही आमदारांनी पारडी उड्डाण पुलाच्या संथ गतीच्या व मार्गावरील खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला नाही. बैठकीनंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कृष्णा खोपडे यांना पारडी उड्डाण पुलाच्या कामासंदर्भात विचारणा केली असता, काम संथ गतीने सुरू असल्याची कबुली त्यांनी दिली.रस्त्यांवरील खड्ड्यांना मेट्रो रेल्वे जबाबदार असल्याची सांगण्यात आले. परंतु पारडी चौक ते कळमना मार्गाशी मेट्रो रेल्वेचा कोणताही संबंध नाही. खोपडे यांनी रस्त्याच्या नादुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला असता तर रस्ता दुरुस्त होण्याला मदत झाली असती.साई प्रकल्पाबाबत आग्रही भूमिकाबैठकीत राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण(साई) चा विषय चर्चेसाठी होता. या प्रकल्पासंदर्भात नितीन गडकरी यांनी दिशानिर्देश दिले. ७१.४२ लाखांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबतच्या पत्रासंदर्भात मात्र खोपडे यांनी गडकरी यांना मािहती दिली. अद्याप या कामाला सुरुवात झालेली नसतानाही साई प्रकल्पाबाबत खोपडे आग्रही दिसले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर