शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

ग्लोबल वॉर्मिंगपासून परतीचे दोर कापले गेलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:03 IST

Nagpur News सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.

ठळक मुद्देओझोन थरांची चाळणी रोखण्यासाठी तातडीने प्रयत्न हवेत२०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले, तर थोडा दिलासा

श्रीमंत माने/निशांत वानखेडे

नागपूर : जगभरातील प्रत्येकाला धडकी भरविणाऱ्या इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) अहवालाने जग जागे झाले व कार्बन डाय ऑक्साइडसह अन्य हरितवायूंचे उत्सर्जन थांबविण्यासाठी तातडीने पावले उचलली तरी पृथ्वीचे वाढलेले तापमान कमी होईल का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, परतीचे दोर कापले गेले आहेत. पुढची तीस वर्षे तापमान वाढतच जाईल. सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराची चाळणी रोखण्याच्या प्रयत्नात २०५० मध्ये हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आले तरी २१०० पर्यंत फारतर दोन दशांश अंश इतकीच घट तापमानात होईल.

अतिउष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, समुद्रांच्या पातळीत धोकादायक वाढ, दीर्घकाळाचे दुष्काळ किंवा हिमशिखरांचे वितळणे हे ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम आता वारंवार दिसू लागले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात अमेरिका व कॅनडा हे देश अतिउष्णतेच्या लाटांनी होरपळून निघाले. भारत, चीन, जर्मनीत महापुरांनी थैमान घातले. सायबेरिया, तुर्की, ग्रीसमध्ये जंगलाला भयंकर वणवा लागला. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात हिमालयामध्ये भूस्खलन, ढगफुटीच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या साेमवारी जारी करण्यात आलेला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आयपीसीसी अहवालात हवामानबदल किंवा तापमानवाढीचे जे परिणाम नोंदविले गेले आहेत, ते हेच आहेत आणि नजीकच्या भविष्यकाळात या घटना कमी होण्याची शक्यता नाही.

शंभर टक्के प्रयत्न केले, तर दोन दशांशांचा दिलासा

* चार हजार पानांच्या आयपीसीसी अहवालाचा सार हाच आहे, की औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या कालखंडाचा विचार करता आताच पृथ्वीचे तापमान १.१ अंश सेल्शिअसने वाढले आहे.

* २०१५ चा पॅरिस करार गंभीरपणे घेण्यात आला नाही. त्यामुळे आणखी काही वर्षे निघून गेली. आता या सहाव्या अहवालानंतर कडक पावले उचलली, तर २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात १.६ अंश सेल्शिअसइतकी वाढ होईल.

* एकविसाव्या शतकाच्या मध्यावर हरितवायूंचे उत्सर्जन शून्यावर आणले तर ही वाढ रोखता येईल; परंतु कार्बन जाळायला, भूगर्भातील इंधन काढायला सुरुवात झाली त्या औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या टप्प्यावर कधीच पोहोचता येणार नाही. फारतर एकविसाव्या शतकाच्या अखेरीस तापमानातील वाढ १.४ अंश सेल्शिअसपर्यंत कमी होईल.

 

असे मानले जाते की, पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत येथील जीवसृष्टी पाच वेळा नष्ट झाली आहे. यापैकी डायनाेसार नामशेष हाेण्याचे उदाहरण सर्वांना परिचित आहे. आता सहाव्यांदा जीवसृष्टी नष्ट हाेण्यासाठी माणूसच जबाबदार असेल. हे सुंदर जग वाचविण्यासाठी आपल्या शेवटच्याच पिढीला प्रयत्न करावे लागतील; अन्यथा विनाश कुणीच राेखू शकणार नाही.

- भगवान केसभट, वातावरण फाउंडेशन, मुंबई

टॅग्स :Earthपृथ्वी