शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 23:42 IST

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे१४ दिवसात एक लाख लोकांचे सर्वेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहेत. लोकांमध्ये ते गेले नाहीत आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.नागपुरात पूर्वी जे चार व्यक्ती कोरोनाबाधित होते त्यांच्यापैकी एक रुग्ण पूर्णत: बरा झाला असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अन्य तीन रुग्णही बरे होत असून पुढील काही दिवसांत त्यांनाही घरी पाठविण्यात येईल. हे चारही रुग्ण परदेशातून आलेले होते. नव्याने जे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांच्यातील एक व्यक्ती आपल्या व्यवस्थापकासह दिल्लीला गेला होता. तेथून आल्यानंतर घरातील काहींच्या संपर्कात ते आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून जे-जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्वेक्षण करत आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत मनपाच्या १८५ चमू २७,४६३ घरात राहणाऱ्या एक लाख लोकांचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चमू लक्ष ठेवेल. असाच सर्व्हे आता संपूर्ण शहरातही सुरू असून सुमारे ४९५ चमू यासाठी कार्यरत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे