शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

माओवाद्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही :स्मिता गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:08 IST

आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.

ठळक मुद्देशहरी नक्षलवादाच्या आव्हानावर टाकला प्रकाश

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : आम्ही आदिवासींच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्य करत असल्याचा दावा माओवाद्यांकडून करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात त्यांना आदिवासींचा अजिबात कळवळा नाही. आदिवासींचे मूलभूत हक्क नाकारुन केवळ शोषण करण्यातच त्यांना धन्यता वाटते, असे प्रतिपादन माओवादी अभ्यासक कॅ. स्मिता गायकवाड यांनी केले. धरमपेठ शिक्षण संस्थेतर्फे आयोजित ‘शहरी नक्षलवाद’ या विषयावर त्यांनी बुधवारी व्याख्यान दिले.आर.एस.मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.उल्हास औरंगाबादकर, प्राचार्य संध्या नायर प्रामुख्याने उपस्थित होते. माओवाद्यांना विकास किंवा आदिवासींचे भले नको आहे. त्यांना केवळ राजकीय सत्ता हवी आहे. माओवादी विचारसरणीच्या राजकीय पक्षांत आदिवासींना कधीच नेतृत्व मिळाले नाही. त्यांच्या हाती केवळ बंदुकाच देण्यात आल्या. ज्या प्रमाणे माओवादी देशातील सुरक्षारक्षक व आदिवासींना जीवे मारतात, त्यातून त्यांचा विकृतपणा दिसून येतो. शहरी नक्षलवाद हा नवीन नाही. माओवादी चळवळीला रसद पुरविणे, आर्थिक मदत करणे, प्रपोगंडा करणे इत्यादी कामे या शहरी नक्षलवादातूनच होतात. शहरी नक्षलवाद हा देशासमोरील मोठे आव्हानच असून त्यांची ओळख करणे कठीण बाब आहे. असे कॅ.गायकवाड म्हणाल्या.‘आयसिस’, अलकायदाच्या रांगेत माओवादी‘सीपीआय’ (एम) वर देशात बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेच्या दहशातवादाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेनुसार धोकादायक संघटनांच्या यादीत ‘‘आयसिस’, ‘बोको हरम’, तालिबान व ‘अल कायदा’ नंतर माओवादी ‘सीपीआय’ (एम)चा पाचवा क्रमांक आहे, असा दावा कॅ.गायकवाड यांनी केला.प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारामाओवाद्यांचे मूळ ध्येय हे देशातील संविधानाला उलथून स्वत:चे साम्राज्य प्रस्थापित करण्याचे आहे. संविधान निर्मितीच्या वेळी १९४९ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माओवादी हे संविधानासाठी सर्वात मोठा धोका ठरु शकतात, असा इशारा दिला होता. त्यांचेच नाव पुढे करुन माओवादी दलितांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाला न मानणारे हे माओवादी आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या उद्देशाने दलितांना ‘टार्गेट’ करत. मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे माओवादी देशाचे मित्र असल्याचे वक्तव्य देतात. प्रकाश आंबेडकरांना जनतेनेच प्रश्न विचारायला हवा, असे कॅ. गायकवाड म्हणाल्या.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर