शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर : नागपुरात सोलर रुफ टॉपसाठी नेट बिलिंग नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 23:16 IST

घरावर अथवा प्रतिष्ठानावर सोलर रुफ टॉप लावून ‘ग्रीन एनर्जी’चा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांना नव्या वर्षात खूशखबर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणाची मागणी खारीज केली आहे.

ठळक मुद्देनेट मीटरिंग संकल्पना खारीज : सौर ऊर्जेचा उपयोग करणाऱ्यांना नववर्षात दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरावर अथवा प्रतिष्ठानावर सोलर रुफ टॉप लावून ‘ग्रीन एनर्जी’चा पर्याय स्वीकारणाऱ्या नागरिकांना नव्या वर्षात खूशखबर आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणाची मागणी खारीज केली आहे. त्यामुळे बिल देण्यासाठी ‘नेट बिलिंग’ नाही, तर ‘नेट मीटरिंग’ प्रणालीच लागू राहणार आहे. आयोगाच्या या निर्णययामुळे सोलर रुफ टॉप लावणाऱ्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार हटली आहे.महावितरणने सोलर रुफ टॉपमुळे २२४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला असून, त्यांच्या बिलिंग प्रणालीमध्ये बदल करण्याची मागणी आयोगाकडे केली होती. या याचिकेमध्ये महावितरणने ‘सोलर रुफ टॉप’च्या बिलिंग प्रणालीला नेट मीटरिंगमधून नेट बिलिंगमध्ये परावर्तित करण्याची मागणी केली आहे. नेट मीटरिंगनुसार ‘सोलर रुफ टॉप’च्या माध्यमातून उत्पादित होणारी अतिरिक्त वीज महावितरण घेऊन वीज बिलात सवलत देत आहे.महावितरणने ३०० युुनिटपर्यंतच ही प्रणाली लागू ठेवण्याची विनंती आयोगाकडे केली होती. त्यापेक्षा अधिक रकमेसाठी नेट बिलिंग लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. यानुसार, महावितरण अतिरिक्त बिल ३.५० रुपये प्रति युनिट या दराने खरेदी करून ग्राहकांना स्लॅबनुसार वीज देणार आहे. हे दर १० रुपयांपेक्षा अधिक असेल. ‘सोलर रुफ टॉप’ लावणाऱ्या नागरिकांकडून याला प्रचंड विरोध आहे. आयोगाने ही याचिका विचाराधीन ठेवली असून, जनतेकडून हरकती आणि सूचना मागविल्या होत्या. याविरोधात हजारोंच्या संख्येने हरकती प्राप्त झाल्या आहेत. नागपुरात याविरोधात ७ ते ११ डिसेंबर या काळात आंदोलनही करण्यात आले होते.अर्जावर १५ दिवसात निर्णय घेण्याचे आदेशमहावितरणने आयोगासमक्ष याचिका दाखल करून सोलर रुफ टॉपसाठी आलेले अर्ज बाजूला सारले होते. आयोगाने दखल घेऊन ग्राहकांच्या अर्जांवर १५ दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. सोलर रुफ टॉपला ग्रीडसोबत आणि ग्राहकांसोबत जोडण्याच्या कराराला प्राथमिकता देण्याचे निर्देश दिले आहेत.रजिस्ट्रेशन शुल्कातही कपातसोलर रुफ टॉप लावणाऱ्या ग्राहकांकडून घेतल्या जाणाऱ्या रजिस्ट्रेशन शुल्कातही कपात करण्यात आली आहे. आता २० केडब्ल्यू भारापर्यंतच्या ग्राहकांना ५०० रुपये आणि त्यापेक्षा अधिक भार असलेल्याकडून प्रति केडब्ल्यू १०० रुपये असे रजिस्ट्रेशन शुल्क घेतले जाणार आहे. आतापर्यंत ५ केडब्ल्यू भारासाठी ५०० रुपयांचे रजिस्ट्रेशन शुल्क आकारले जायचे, त्यापेक्षा अधिक भारावर एक हजार रुपये आकारले जात असत.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण