शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

मनपापुढे आर्थिक संकट नाही

By admin | Updated: May 19, 2014 00:50 IST

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विकास कामासाठी निधी नसल्याची ओरड सुरू आहे.

एलबीटी : उत्पन्न कमी होऊनही नवीन स्रोतांचा शोध नाही

\राजीव सिंग - नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी) महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे विकास कामासाठी निधी नसल्याची ओरड सुरू आहे. एलबीटीमुळे १५०-२०० कोटींचे उत्पन्न बुडाल्याचा प्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षाच्या जकात उत्पन्नाच्या तुलनेत १०० कोटीने उत्पन्नात घट झाली आहे. मागील वर्षी जकातीपासून ४८५ कोटी १३ लाखाचे उत्पन्न मिळाले होते, तर २०१३-१४ या वर्षात एलबीटीपासून ३८५.३९ लाखाचे उत्पन्न प्राप्त झाले. यात १०० कोटींची तफावत आहे. अनाठायी खर्चाला आवर व नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्याकडे प्रशासन व पदाधिकार्‍यांचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुद्रांक शुल्कापोटी १ टक्के रक्कम एलबीटी म्हणून मिळणार आहे. गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कापासून ६५ कोटी वसूल करण्यात आले. परंतु शासनाकडून यातील जेमतेम १५ कोटी मनपाला प्राप्त झाले आहे. ३१ मार्च २०१४ पर्यंत मनपा तिजोरीत ८०१ कोटींचा महसूल जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत १०० कोटींनी कमी आहे. मुद्रांक शुल्कापोटी शासनाकडून येणे असलेली रक्कम प्राप्त झाली तर तफावत ५० कोटींनी कमी होऊ शकते. संपत्ती करापासून गेल्या वर्षी १६३ कोटींचे उत्पन्न झाले होते. यंदा मनपाला १८९ कोटी मिळाले. २६ कोटी अधिक मिळाले. नगररचना विभागाचे उत्पन्न ६५ कोटी आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधल्याचा दावा स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला होता. एलबीटीमुळे मनपा उत्पन्नावर फारसा परिणाम पडणार नाही, असा दावा त्यांनी केला होता. त्यादृष्टीने काही निर्णयही घेण्यात आले. परंतु आयुक्त श्याम वर्धने यांनी आपल्या अर्थसंकल्पात ३५३.२ कोटींची कपात केली. वास्तव अर्थसंकल्प १०४७.८० कोटींवर आणला. तसेच २०१४-१५ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प १०६१.५१ कोटींचा दिला. नवीन आर्थिक स्रोताबाबत आयुक्त आश्वस्त नसल्याने, त्यांनी हा निर्णय घेतला असावा.