शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
3
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
4
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
5
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
8
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
9
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
10
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
11
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
12
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
14
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
15
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
16
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
17
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
18
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
19
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?
20
PM मोदी यांनी इंदिरा गांधींनाही टाकलं मागे, ठरले सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे दुसरे व्यक्ती; त्यांचे हे महाविक्रम जाणून तुम्हीही थक्क व्हाल

आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण नाही - आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित

By आनंद डेकाटे | Updated: October 4, 2023 15:44 IST

आदिवासी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य : सुराबर्डीतच होणार गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय ; अधिवेशन काळात भूमीपूजन

नागपूर : आदिवासींचे हक्क व विकासासाठी राज्य शासन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आदिवासींच्या आरक्षणामधून अन्य कुणालाही आरक्षण देण्यात येणार नाही, अशी ग्वाही आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे आदिवासी साखळी उपोषणकर्त्यांना दिली.

संविधान चौक येथे संयुक्त आदिवासी कृति समितीच्यावतीने गेल्या २५ सप्टेंबरपासून सुरु असलेल्या साखळी उपोषणाला डॉ. गावित यांनी बुधवारी भेट दिली व उपोषणकर्त्यांच्या मागण्यां संदर्भात चर्चा केली. त्यांनी सांगितले की, राज्य शासन आदिवासी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आदिवासींच्या आरक्षणातून कोणालाही आरक्षण देण्यात येणार नाही आणि तशी शिफारसही केंद्र शासनाला करण्याची शासनाची भूमिका आहे.

आदिवासी विकास विभागाच्यावतीने मंजूर आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तथा प्रशिक्षण केंद्राची स्थापना नागपुरातील सुराबर्डी येथेच होणार असून येत्या हिवाळी अधिवेशनकाळात या संग्रहालयाचे भूमीपुजन करण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. गडचिरोली येथील आंदोलनावेळी आदिवासी युवकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाने शासकीय वसतिगृहातील भोजनावळ बंद केली असून त्याऐवजी थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा करण्यात येते (डिबिटी). आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहात पुन्हा भोजनावळ सुरु करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली. गरज तिथे आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृह सुरु करण्यात येणार. आदिवासींना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासनाचे प्राधान्य असून शबरी घरकुल आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना येत्या दोन वर्षात हक्काची घरे बांधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेतून १ लाख २५ हजार घरे बांधून देण्याचे नियोजन असून शहरी भागांमध्येही आदिवासींना या योजनेतून घरे बांधून देण्यात येत असल्याचे सांगून उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याची आवाहनही डॉ.गावित यांनी केले.यावेळी जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे आणि सदस्य शांता कुमरे, अ.भा.आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष दिनेश शेराम, ट्रायबल ऑफिसर फोरमचे अध्यक्ष एम. आत्राम, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव संदीप जोशी आदी उपस्थित होते.

टॅग्स :reservationआरक्षणVijaykumar Gavitविजय गावीतagitationआंदोलनStrikeसंपDhangar Reservationधनगर आरक्षण