शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

मनपात पदभरती नाही; ७५ टक्के कर्मचारी होणार सेवानिवृत्त

By गणेश हुड | Updated: April 20, 2023 15:08 IST

नवीन आकृतीबंधचा विचार करता ९९१८ पदे तातडीने भरण्याची गरज आहे.

नागपूर : महापालिकेत मागील २० वर्षात पदभरती झालेली नाही. जुन्या मंजूर १३१८३ पदापैकी ६ हजार पदे रिक्त आहेत. त्यात पुढील दोन वर्षात जवळपास ७५ टक्के कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होतील. दुसरीकडे मागील काही वर्षात शहाराच्या विस्तारासोबतच मनपाचे कार्यक्षेत्रातही वाढले आहे. त्यानुसार १७१०९ पदांचा नवीन आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु हा प्रस्ताव वर्षभरापासून शासन स्तरावर प्रलंबित असल्याने मनपाचा प्रशासकीय कारभार कोलमडला आहे.

नवीन आकृतीबंधचा विचार करता ९९१८ पदे तातडीने भरण्याची गरज आहे. मोठयाप्रमाणात रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या पदामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. मनपातील जुन्या मंजूर १३ हजार १८३ पदांचा आढावा घेतला असता. यातील जवळपास ७१८३ पदे कार्यरत असून ६ हजार पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे वर्ग-१ ची १९९ पदे मंजूर असताना ८० कार्यरत असून ११९ पदे रिक्त आहेत. वर्ग -२ ची ७७ पदे मंजूर असून २१ पदे कार्यरत असून ५६ पदे खाली आहेत. वर्ग -३ ची ३७९१ मंजूर असून १५९० पदे कार्यरत असून २२०१ पदे रिक्त आहेत. काही विभागांचा कारभार प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकान्यांवर सुरू आहे. तर कंत्राटी व अनुकंपावरील कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेतली जात आहे.

३१ ऑक्टोबर २०२२ मध्ये शासनाने पदभरतीवरील निर्बंधामध्ये शिथीलता दिली होती. सुधारित आकृबंध अंतिम झाला आहे. अशा विभागांना शंभर टक्के पदभरतीला मंजुरी दिली आहे. तर आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही. अशा विभागातील ८० टक्के पदे भरण्याला मुभा दिली होती. आकृतीबंध अतिम झालेला नाही. अशा प्रशासकीय कार्यालयांना पदाचा आढावा घेवून उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यतेची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही भरती झालेली नाही.

आढावा संपता संपेनाशासनाचा पदभरती संदर्भात आदेश आला होता. मात्र आर्थिक स्थितीचा विचार करता सर्व पदे भरल्यास आस्थापना खर्च वाढणार आहे. याचा विचारात अत्यावश्यक पदांची भरती करण्यासंदर्भात प्रशासन स्तरावर आढावा घेतला जात आहे .वर्षभरापासून नुसता आढावा घेतला जात आहे.

आस्थापना खर्चाच्या भितीत उत्पन्नावर पाणीमनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्केच्या वर असल्याचे कारण सांगून आजवर पदभरती करण्यात आलेली नाही. परिणामी ६० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. असल्याने कर वसुलीवर परिणाम झाला आहे. कर विभागात वसुलीसाठी कर्मचारी नाही. एकाच निरक्षकाकडे दोन- दोन प्रभागांचा भार आहे. लोकांना देयके मिळत नाही. परिणामी ६०० कोटींची वसुली अपेक्षित असताना ३०० कोटींची वसुली होत नाही.

नवीन आकृती बंधानुसार पदे -१७१८३जुनी मंजूर पदे- १३१८३कार्यरत पदे -७१८३रिक्त पदे - ६०००

टॅग्स :nagpurनागपूर