शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तीन अर्ज दाखल, रामटेकमध्ये एकही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:59 IST

नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार आहे.

ठळक मुद्देतीन दिवसात १४८ लोकांनी घेतले १९० अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, रामटेककरिता एकही अर्ज अद्याप दाखल झालेला नाही. नागपूर व रामटेक लोकसभा मिळून गेल्या तीन दिवसात १४८ लोकांनी १९० अर्ज घेतले. धुलिवंदनानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास जोर वाढणार आहे.सोमवारपासून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिल्या दिवशी अब्दुल पटेल तर दुसऱ्या दिवशी उत्तम दुपारे यांनी अर्ज दाखल केले. आज बुधवारी दीपक लक्ष्मणराव मस्के यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. हे तीनही अर्ज नागपूर लोकसभा मतदार संघासाठी दाखल झाले. रामटेककरिता आतापर्यंत एकही अर्ज दाखल झाला नाही. आतापर्यंत रामटेककरिता ५१ लोकांनी ७५ अर्ज नेले तर नागपूरकरिता ९७ लोकांनी ११५ अर्ज नेले.आतापर्यंत एकाही मोठ्या पक्षाच्या उमेदवाराने अर्ज सादर केलेला नाही. भाजपतर्फे नितीन गडकरी हे उमेदवार राहणार हे निश्चित असले तरी अजून त्यांच्या पक्षाकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. काँग्रेसतर्फे नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. परंतु त्यांनीही अद्याप अर्ज सादर केलेला नाही. विदर्भ निर्माण महामंचचे उमेदवार अ‍ॅड. सुरेश माने हे २२ तारखेला अर्ज सादर करणार असल्याची माहिती आहे. नितीन गडकरी हे शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणार आहेत. काँग्रेसचे पटोले हे सुद्धा शेवटच्या दिवशी अर्ज सादर करू शकतात. बसपा आणि बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराची घोषणाही अद्याप व्हायची आहे. एकूणच धुलिवंदनानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांचे चित्र स्पष्ट होईल, तेव्हा उमेदवारी अर्ज भरायलाही जोर वाढेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर