शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

औषधांच्या स्ट्रीपमध्ये गोळ्याच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:06 IST

डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.

ठळक मुद्देरुग्णाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉक्टरांनी एखाद्या आजारासाठी लिहून दिलेल्या औषध स्ट्रीपच्या (१० गोळ्या) स्वरुपात रुग्णाने घरी नेल्यानंतर त्यात गोळ्याच नसल्यास रुग्णांना कसा मनस्ताप होतो, याचा प्रत्यक्ष एका नागरिकाला आला. त्यांना गुरुवारी रात्री आणि सकाळी औषधाविना राहावे लागले.प्राप्त माहितीनुसार, एका नागरिकाने मुंबईतील ज्युपिटर बायोलॅब प्रा.लि. कंपनीच्या अ‍ॅसिडिटी आजारावरील ‘ज्युपिसिड-४०’ या १० गोळ्यांच्या तीन स्ट्रीप (एक स्ट्रीप १० गोळ्या) आणि सोबतच अन्य अशी एकूण १०२९ रुपये किमतीची औषधे गुरुवारी सदर येथील एका फार्मसीतून खरेदी केली. फार्मसिस्टवर विश्वास ठेवून त्यांनी ही औषधे घरी नेली. औषध सेवन करण्याची वेळ झाली तेव्हा पॅक स्ट्रीपमध्ये एकही गोळी नव्हती. रात्र झाल्याने फार्मसीमध्ये परत जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांना औषधाविना राहावे लागले. गोळी न घेतल्यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास रात्री आणि सकाळी उद्भवला. अ‍ॅसिडिटीची गोळी असल्यामुळे सहन केल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारात फार्मसिस्टचा काहीही दोष नाही. उत्पादक ते वितरक आणि विक्रेत्यांच्या माध्यमातून विकण्यात येणाऱ्या गोळ्या रुग्णांपर्यंत पोहोचतात. रुग्ण औषधे खरेदी करताना स्ट्रीमध्ये गोळ्या आहेत की नाही हे तपासून पाहात नाहीत. पण असा प्रकार घडल्यानंतर रुग्ण थेट फार्मसिस्टला दोष देतो. हा प्रकार रुग्णांना मनस्ताप देणारा आहे. अशा प्रकारासाठी कंपनीची थेट चौकशी करावी, अशी मागणी नागरिकाने लोकमतशी बोलताना केली.

टॅग्स :medicineऔषधंnagpurनागपूर