शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

‘फ्रेंचायझी’च्या नावाखाली नागपुरातदेखील थाटली कार्यालये; परवानगी नसताना ऑनलाईन शिक्षणाचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 07:00 IST

Nagpur News विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’चा वापर

योगेश पांडे

नागपूर : विद्यापीठांची ‘फ्रँचायझी’ असल्याचा दावा करून विविध एज्युटेक कंपन्या, तसेच ॲपतर्फे विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न होत असून, काहींनी नागपुरातदेखील कार्यालये थाटली आहेत. तेथूनच विद्यार्थ्यांची भलामण करण्याचे काम सुरू आहे. सबकुछ ऑनलाईनच्या जमान्यात विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांतर्फे ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’चा वापर करण्यात येतो. एकदा विद्यार्थ्यांनी एखाद्या ‘फ्रँचायझी’बाबत ‘सर्च’ केले की वारंवार त्याच्या ‘सोशल’ खात्यांवर त्याचसंदर्भातील ‘पोस्ट’ दिसत असल्याने विद्यार्थीदेखील नकळत या अभ्यासक्रमांकडे खेचले जातात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाला जोर आला असताना याचा गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढले आहेत; परंतु प्रत्यक्षात मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थांना ‘फ्रँचायझी’च्या माध्यमातून दूरस्थ शिक्षण सुविधा देण्याची परवानगीच नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील स्पष्ट केले आहे. असे असताना देशातील अनेक शहरात ‘फ्रँचायझी’चा बाजार थाटण्यात आला आहे. नागपुरात काही खाजगी कंपन्या व ‘ॲप’ने विविध विद्यापीठांची नावे समोर करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने दाखविली आहेत. अमूक विद्यापीठाची पदवी तुम्हाला मिळेल असा दावा केला जात असून, यातूनच विद्यार्थी त्यांच्या जाळ्यात फसत आहेत. अनेक ‘फ्रँचायझी’कडून ‘एजंट’देखील नेमण्यात आले असून, ‘ऑनलाईन’ प्रचार-प्रसारावरदेखील बराच भर देण्यात येत आहे. काही विशिष्ट ‘सोशल’ माध्यमे किंवा ‘ॲप’च्या माध्यमातून वारंवार विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर ‘फ्रँचायझी’बाबतच माहिती कशी काय येईल याची तजवीज करण्यात येते. एखादी गोष्ट वारंवार समोर येत असल्याने विद्यार्थीदेखील नकळतपणे त्या जाळ्यात अडकतात, असे चित्र आहे.

नागपुरातदेखील ‘एजंटस्’ अन् कार्यालये

‘फ्रँचायझी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुक्त व दूरस्थ शिक्षण देण्याचा दावा करणाऱ्या कंपन्या व ॲप्सची नागपुरातदेखील कार्यालये व एजंटस् आहेत. इतवारी, सक्करदरा, नंदनवन, धरमपेठ, इत्यादी ठिकाणी त्यांची कार्यालये असून, विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू असतात. विविध कोचिंग क्लासेसशीदेखील ‘टायअप’ करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

‘लर्नर सपोर्ट सेंटर’लादेखील परवानगी नाही

‘लर्नर सपोर्ट सेंटर’च्या नावाखालीदेखील कंपन्या व ॲपतर्फे विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न होतो. मात्र, उच्च शिक्षण संस्थांना थेट अशी केंद्रे उघडण्याची परवानगी आहे. एखाद्या फ्रँचायझी किंवा आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून त्यांना ‘एलएससी’ स्थापन करता येत नाही, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव रजनीश जैन यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र