कोविड रुग्णांसाठी नागपूर शहरात ५३ रुग्णालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 09:22 PM2020-09-23T21:22:18+5:302020-09-23T21:23:34+5:30

शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

There are 53 hospitals in Nagpur for Covid patients | कोविड रुग्णांसाठी नागपूर शहरात ५३ रुग्णालये

कोविड रुग्णांसाठी नागपूर शहरात ५३ रुग्णालये

Next
ठळक मुद्देमनपाच्या प्रयत्नाने ३,४३६ बेड्स उपलब्ध : गरजूंनी नियंत्रण कक्षाशी संंपर्क साधावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या व रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत, महापालिकेने आवश्यक कार्यवाही करून शहरातील ५३ रुग्णालये रुग्णांसाठी उपलब्ध केली आहते. यात ६ शासकीय आणि ४७ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.
शासकीय रुग्णालयांत १,५१४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १,९२२ बेड्स असे एकूण ३,४३६ बेड्स कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत.
या सर्व रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू असून येथे बेड्सच्या उपलब्धतेनुसार अतिजोखमीच्या रुग्णांना भरती केले जात आहे. कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची स्थिती लक्षात यावी, यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ - २५६७०२१ या क्रमांकावर शहरातील रुग्णालयातील बेड्सची माहिती मिळेल. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होऊ नये यासाठी मनपातर्फे डॅशबोर्डसुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खासगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची रिअल टाईम माहिती अपडेट केली जाते. खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खासगी रुग्णालयामध्ये एक कोरोना मित्र नियुक्त करण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांसंदर्भात कुठलीही तक्रार नागरिकांना असल्यास त्याची माहिती त्वरित कोरोना मित्राला देण्यात यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

प्रत्येक झोनमध्ये ५ रुग्णवाहिका
कोविड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी झोनस्तरावर यंत्रणा बळकट केली आहे. कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

झोनस्तरावर नियंत्रण कक्ष
कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोविड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना कोविड नियंत्रण कक्षाचे नोडल आॅफिसर नियुक्त केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या किंवा अतिजोखमीच्या रुग्णांना कोणताही त्रास होत असल्यास नागरिकांनी त्वरित संबंधित झोनच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधावा.

झोनस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक
लक्ष्मीनगर- ०७१२ - २२४५०५३
धरमपेठ -०७१२ - २५६७०५६
हनुमाननगर - ०७१२ -२७५५५८९
धंतोली -०७१२ -२४६५५९९
नेहरुनगर -०७१२ -२७०२१२६
गांधीबाग -०७१२ -२७३९८३२
सतरंजीपुरा -मो.नं.७०३०५७७६५०
लकडगंज -०७१२- २७३७५९९
आशीनगर ०७१२ - २६५५६०५
मंगळवारी -०७१२ - २५९९९०५
केंद्रीय नियंत्रण कक्ष ०७१२ -२५६७०२१

कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे बाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु केली आहे. रुग्णवाहिकेसाठी टोल फ्री क्रमांक १०२ व १०८ यावर दूरध्वनी केल्यास तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी टोल फ्री क्रमांक १०२ व १०८ या क्रमांकावर सुरू करण्यात आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्स रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: There are 53 hospitals in Nagpur for Covid patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.