शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
4
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
5
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
6
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
7
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
8
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
9
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
10
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
11
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
12
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
13
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
14
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
15
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
16
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
17
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
18
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
19
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
20
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस

-तर आम्ही राफेल करारच रद्द करू; प्रियंका चतुर्वेदी यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:06 IST

जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘डील’ नव्हे तर मोठा भ्रष्टाचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राफेल विमान करारावरून काँग्रेसने परत एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हा करार नाही तर एक मोठा भ्रष्टाचारच आहे. जर आम्ही सत्तेवर आलो व जनतेचे हित असेल तर आम्ही राफेल करार रद्द करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केले. नागपुरात ‘नागपूर प्रेस क्लब’ येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रविवारी वरील वक्तव्य केले.‘मीट द प्रेस’ या कार्यक्रमाला ‘नागपूर प्रेस क्लब’चे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, उपाध्यक्ष जोसेफ राव, सरचिटणीस ब्रह्माशंकर त्रिपाठी, संजय तिवारी, विशाल मुत्तेमवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. भारत व फ्रान्स यांच्यात २००८ मध्ये झालेल्या सुरक्षा कराराचा हवाला देऊन राफेल विमान खरेदीचा तपशील देण्यास मोदी सरकारने नकार दिला आहे. अगोदर केंद्रीय रक्षा राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी प्रत्येक विमान ६७० कोटी रुपयांच्या किमतीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर नेमकी किंमत सांगता येणार नाही, असे सांगण्यात आले व अखेर गोपनीयतेचा हवाला देत रक्षामंत्र्यांनी काहीच माहिती दिली नाही. जो फायदा देशातील ‘हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड’ला मिळायला हवा होता, तो आता फ्रान्समधील ‘डेसॉल्ट’ व ‘रिलायन्स डिफेन्स इंडस्ट्रीज’ला मिळणार आहे. जी कंपनी सायकलदेखील बनवत नाही, तिला विमान बनविण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. या एकूण करारामुळे बाहेरील कंपन्यांना विविध माध्यमातून एक लाख करोड रुपयांचा फायदा होणार आहे. हा भ्रष्टाचाराचा प्रकार नाही तर काय, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केला. राफेल प्रकरणाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह असून, संयुक्त संसदीय समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली. प्रदीपकुमार मैत्र यांनी प्रास्ताविक केले. ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी संचालन केले तर जोसेफ राव यांनी आभार मानले.

‘त्यांच्या’साठी ‘सोशल मीडिया’च संहारक ठरेल२०१९ मधील निवडणुकींच्या प्रचारासाठी आम्ही केवळ ‘सोशल मीडिया’वर अवलंबून नाही. आम्ही सर्व माध्यमांतून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. भाजपाच्या ‘ट्रोल आर्मी’वर त्यांच्याच मंत्री सुषमा स्वराज यांनी टीका केली होती. ज्या ‘सोशल मीडिया’मुळे हे लोक वर आले, तेच माध्यम त्यांच्यासाठी संहारक ठरेल, असे प्रतिपादनदेखील प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

शिवसेनेवर साधला निशाणाराज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय पक्षांचा खरा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातील सत्तेत सहभागी असलेल्या एका पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीका करण्यात येते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ राहून ते आपल्या जबाबदारीपासून दूर पळाले, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदी यांनी शिवसेनेचे थेट नाव न घेता निशाणा साधला. राफेल करारामध्ये महाराष्ट्र सरकार किंवा काही केंद्रीय मंत्र्यांचादेखील सहभाग असल्याने त्यांच्यावरदेखील जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेदेखील त्या म्हणाल्या.नेमके नुकसान तरी किती?राफेल करारामुळे देशाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत काँग्रेसमध्येच एकवाक्यता नसल्याची बाब यावेळी समोर आली. या करारामुळे देशाचे थेट ४१ हजार कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी मागील आठवड्यात यामुळे ४८ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. याबाबत चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सरकारकडून दिलेल्या आकडेवारीवरून आम्ही नुकसान सांगत असल्याचे स्पष्ट केले. मात्र सरकारने आकडेवारीच जाहीर केली नसल्याने नेमके नुकसान झाले तरी किती, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस